नागपूर : देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल इलिजिबिलिटी कम एंन्टर्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच ऑल इंडिया पहिली रॅक प्राप्त केली आहे. वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान या विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण प्राप्त करून नागपूरचे नाव देशपातळीवर पोहोचविले आहे.
advertisement
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे 5 मे रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून 24 लाख विद्यार्थी या परीक्षेला सामोरे गेले. यातील 89 विद्यार्थ्यांनी एआयआर- 1 रॅक प्राप्त केली आहे. नागपुरातून जवळपास 19 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील दीड हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. यामध्ये वेद शेंडे आणि क्रिष्णमूर्ती शिवान यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत.
नोकरी अन् व्यवसायाची दुहेरी संधी, दहावीनंतर घ्या ITI ला प्रवेश, पाहा संपूर्ण प्रक्रिया
कशी केली तयारी?
वेदचे वडील डॉ. सुनील शेंडे हे ईएनटी सर्जन आहेत तर आई डॉ. शिल्पा शेंडे या आयजीजीएमसीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. डॉक्टर होण्याचे ध्येय ठेवत वेदने दहावीनंतर नीटची तयारी सुरू केली. 'नीट परीक्षेचा अभ्यास करताना सातत्याता आणि एकाग्रता खुप महत्त्वाची आहे. मी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःचा बेस पक्का केला. शिवाय एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले. दडपण न ठेवता रिलॅक्स राहून अभ्यास केला. दररोज मी 8 तास अभ्यास करायचो. त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो', असं वेदने सांगितले.
गोर गरिबांसाठी 1 रुपयात शिक्षण, नागपुरातील तरुणाने सुरु केलं कॉन्व्हेंट
सोशल मीडियापासून राहा दूर
'नियमित अभ्यासाशिवाय यशाचा दुसरा पर्याय नाही. दररोज 7 ते 8 तास एकाग्रतेने अभ्यास करणे गरजेचे आहे. चाचणी परीक्षा सोडविणे आणि चुका दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर आपण सोशल मीडियापासून जेवढे दूर राहू तेवढा फायदा आपल्या होतो. सुरुवातीपासून डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि दहावीनंतर तयारी सुरू केली होती. आज यश मिळाले आहे', असे क्रिष्णमूर्ती शिवान याने सांगितले आहे.