मुलाने एकूण 13 ग्रॅम सोन्याची केली चोरी
या प्रकरणातील मुलाचे नाव अक्षय विलास मोरे (वय-२५) असून त्याच्याविरुद्ध आई हेमा विलास मोरे (वय-42, रा. बेबलेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणातील समोर आलेली माहिती अशी की, ही चोरी मार्च 2025 मध्ये घडली होती. चोरट्यांनी 5 लाखांचे 5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, 40 हजारांची 12 ग्रॅम वजनाचे मोहन माळ, 72 हजार रुपयांची 4 ग्रॅमची अंगठी, तसेच टाॅप्स, सोन्याच्या रिंग्ज, असा एकून 12 ग्रॅमचा सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली होती.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी काय केले?
चोरीचा गुन्हा पोलिसांत दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. या तपासात अक्षयला ताब्यात घेण्यात आले. ज्यावेळी त्याला पोलिसी खाक्या दाखवला, त्यावेळी त्याने स्वतःच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्राचा शोध सुरू आहे. त्याचबरोबत चोरलेले सोने कुठे ठेवले किंवा कुठे विकले, यासंदर्भात अजून पोलीस तपास करत आहेत.
हे ही वाचा : आई झोपताच साधला डाव, नराधमाने चिमुकलीला रेल्वे स्थानकावरून उचललं अन्.., बीडला हादरवणारी घटना
हे ही वाचा : 'मागण्या पूर्ण करा, अन्यथा बेमुदत संप पुकरणार', कोल्हापूर मनपा कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला इशारा!