'मागण्या पूर्ण करा, अन्यथा बेमुदत संप पुकरणार', कोल्हापूर मनपा कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला इशारा!

Last Updated:

Kolhapur News : कोल्हापूर महापालिक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 3 ऑक्टोपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे पत्र महापालिका...

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News : कोल्हापूर महापालिक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 3 ऑक्टोपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यासंबंधीचे पत्र महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे, उपाध्यक्ष विजय चरापले यांनी प्रशासनकांनी दिले आहे.
महापालिक कर्मचाऱ्यांचा 'या' आहेत मागण्या
महापालिका कर्मचारी संघटनेने आपल्या कर्मचारी सभासदांच्या 17 हून अधिक मागण्यांसाठी 3 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. महानगरपालिका प्रशासनाला मागण्यांचे पत्र दिले आहे. त्यात लाड-पागे तत्वानुसार सेवानिवृत्त किंवा मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला 30 दिवसांत आदेश द्यावेत. मनपा गणवेशपत्रधारकांना गणवेश देण्याची त्वरित अंमलबजावणी करावी. सरकारने मनपा कर्मचाऱ्यांना जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या बारा महिन्यांचा वेतन फरक द्यावा. महत्त्वाच्या विभागात मनुष्यबळ अपुरे आहे.
advertisement
त्यात प्राधान्याने वर्कशॉप, बाग खाते, फायर स्टेशन, हॉस्पिटल येथे कर्मचारी अपुरे आहेत, ते तातडीने भरावेत. तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करावी. हंगामी व ताप्तुरत्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. मात्र, काहींचे वय 60 झाल्याने काम देणे बंद केले आहे.
मागण्याचा पूर्ततेसाठी 1 महिन्यांचा कालावधी
त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या न्यायालयाने कायम करून आर्थिक लाभ देण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर करावी. ठोक मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अशा अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी महापालिका प्रशसानाला 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर 3 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मागण्या पूर्ण करा, अन्यथा बेमुदत संप पुकरणार', कोल्हापूर मनपा कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला इशारा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement