लग्नासाठी बळजबरी
पीडित मुलगी आपल्या आई आणि दोन लहान बहिणींसोबत राहत होती. 2017 मध्ये ती सातवीत असताना, तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे धारूर येथील एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले. लग्नाला आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा आणि चुलत सासू यांनी तिला लग्नासाठी बळजबरी केली. त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आले. तिथे पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तिने याबद्दल आई आणि सासूला सांगितले असता, त्यांनी तिलाच गप्प बसण्यासाठी धमकावले.
advertisement
आई आणि पतीचे संबंध
याच काळात पीडितेने आपल्या आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचे पाहिले. यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला. ‘तू आम्हाला बदनाम करतेस’ असे बोलून तिचा छळ करण्यात आला. हा त्रास असह्य झाल्याने ती मार्च 2022 मध्ये आजी-आजोबांकडे गेली. पण तिथेही आई आणि पती पोहोचले.
पीडितेला दिलासा
या छळातून सुटका व्हावी म्हणून पीडिता 17 एप्रिल 2022 रोजी अंबाजोगाई येथील 'मानवलोक सेवाभावी संस्थे'त गेली. तेथील अधिकारी अरुंधती पाटील यांना तिने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर संस्थेतील अश्विनी जगताप यांनी तिला बीड येथील बाल कल्याण समितीसमोर हजर केले. समितीच्या आदेशानुसार ती आता अंबाजोगाई येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या बालगृहात राहत आहे. ऑगस्ट 2025 मध्ये बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी भेट दिल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि चार वर्षांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बीडमधील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य संतोष वारे, सुरेश राजहंस आणि छाया गडगे यांनी पीडितेला धीर दिला आहे.
हे ही वाचा : Kolhapur Politics : कोल्हापूर मनपाच्या 'वॉर्डात' पुन्हा उत्साह; पण इच्छुकांच्या मनात आजही धास्ती, पण कसली?