TRENDING:

सिनेमा स्टाईल मर्डर! 'रईस' सिनेमा पाहून चिरला मित्राचा गळा, बनवला व्हिडीओ अन् पाठवला भावाला, पुढे...

Last Updated:

'रईस' चित्रपटातून प्रेरणा घेत आरोपीने मित्र अभिषेक त्रिपाठीची गळा चिरून हत्या केली. ही घटना मोबाईलवर शूट करून त्याचा व्हिडीओ कुटुंबीयांना पाठवण्यात आला. अभिषेकला...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक आणि फिल्मी स्टाईल हत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. हे भयानक कृत्य करणारा आरोपी शाहरुख खानच्या 'रईस' (Raees) सिनेमातून इतका प्रभावित झाला होता की, त्याने त्याच चित्रपटातील एका दृश्याची नक्कल करत मित्राच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला.
Crime News
Crime News
advertisement

हत्या बनली 'व्हिडिओ शूटिंग'चा भाग

7 मे रोजी अभिषेकच्या (Abhishek Tripathi) कुटुंबाला एक व्हिडिओ पाठवण्यात आला, ज्यात एक तरुण अभिषेकचा गळा चिरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दुसरा एकजण त्याला "मोबाईल फेकून देऊ का?" असं विचारतो आणि तो तिथेच मोबाईल फेकून देतो. एखाद्या सिनेमाप्रमाणे या हत्येचं शूटिंग करण्यात आलं होतं. आरोपीला ही हत्या 'रईस' सिनेमातील 'क्लासिक गँगस्टर स्टाईल'मध्ये दाखवायची होती.

advertisement

15 किमी दूर जंगलात बोलावून केली हत्या

कोणताही माग काढता येऊ नये यासाठी अभिषेकला 15 किलोमीटर दूर भाखरी कला गावातील जंगलात बोलावण्यात आलं होतं. तिथे आधीच असलेल्या दोन अल्पवयीन गुराख्यांना आरोपींनी धमकावून हाकलून दिलं आणि मग अभिषेकला जंगलात घेऊन गेले. तिथे त्याला काठीने मारहाण करून अर्धमेलं केलं. यानंतर ते म्हणाले, "तुला बाकीचे पैसे पाहिजे आहेत का? चल, आजच हिशेब पूर्ण करूया..." आणि तिथूनच क्रूरतेची सर्वात भयानक कहाणी सुरू झाली.

advertisement

मुख्य आरोपी रजनीश मिश्राने अभिषेकला जनावराप्रमाणे जमिनीवर पाडले आणि चाकूने त्याचा गळा कापू लागला, तर त्याचा साथीदार राजकुमार हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होता. आरोपी रजनीशने हा व्हिडिओ आपला भाऊ गोलू मिश्राला पाठवला, जेणेकरून त्याला आपली 'हिंमत' दाखवता येईल.

व्हिडिओ पाहून साक्षीदार हादरले, सत्य समोर आले

गोलूने हा व्हिडिओ कुलदीप त्रिपाठीला दाखवला. कुलदीपने हा व्हिडिओ आपल्या कुटुंबाला दाखवला आणि त्यांच्यामार्फत ही माहिती अभिषेकच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. त्यानंतर कुटुंबीय थेट पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांना मोबाईलमध्ये व्हिडिओ दाखवला, जो पाहून पोलीसही हादरले.

advertisement

पोलिसांनी आरोपींना अटक केली, चौकशी सुरू

अतिरिक्त एसपी विवेक लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता सायबर सेल आणि मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने पुढे नेला जात आहे, कारण ही हत्या कोणत्याही सामान्य वादातून झाली नसून, चित्रपटातून प्रेरित झालेल्या विकृत मानसिकतेचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे.

advertisement

चित्रपटांच्या प्रभावाखाली येऊन गुन्हेगारीच्या जगात पाऊल टाकणे किती धोकादायक ठरू शकते, याचा इशारा ही घटना देते. एका मित्राने पैशासाठी आणि आपल्या विकृत आवेशासाठी स्वतःच्या मित्राची क्रूरपणे हत्या केली आणि ती कॅमेऱ्यात रेकॉर्डही केली. आता समाज, पोलीस आणि कुटुंबीय या सर्वांना मिळून प्रश्न विचारावा लागेल: आपले मनोरंजनाचे पडदे हिंसेची शाळा बनत आहेत का?

हे ही वाचा : पुण्याच्या कोमल जाधवची परप्रांतीय तरुणांकडून हत्या, दोघांनी घराखाली बोलवलं अन्... घटना CCTV मध्ये कैद

हे ही वाचा : पुणे हादरलं! बाइकवरून आले अन् सपासप वार केले, पिंपरीत मध्यरात्री रक्तरंजित राडा

मराठी बातम्या/क्राइम/
सिनेमा स्टाईल मर्डर! 'रईस' सिनेमा पाहून चिरला मित्राचा गळा, बनवला व्हिडीओ अन् पाठवला भावाला, पुढे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल