पुण्याच्या कोमल जाधवची परप्रांतीय तरुणांकडून हत्या, दोघांनी घराखाली बोलवलं अन्... घटना CCTV मध्ये कैद
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Komal Jadhav Case: पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणीची दोन परप्रांतीय तरुणांनी निर्घृण हत्या केली आहे.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणीची दोन परप्रांतीय तरुणांनी निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी दुचाकीवरून येत तरुणीचा भररस्त्यात खून केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
कोमल भरत जाधव असं हत्या झालेल्या १८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती पिंपरी चिंचवड शहरानजीक असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहते. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी तिची निर्घृण हत्या केली. आरोपींनी सोबत आणलेल्या सुरा आणि कोयत्या सारख्या हत्याराने वार केल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही आरोपी मयत तरुणीच्या ओळखीचे असल्याची माहिती समोर आली असून ते मुळचे दिल्लीचे रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती. यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं. कोमल घराच्या खाली असता आरोपींनी तिच्यावर निर्दयीपणे वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, कोमल जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
आरोपींनी अंगात काळे कपडे आणि हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चिंचवड पोलिसांचं डीबी स्कॉड, तपास पथक आणि गुंडा विरोधी पथकाने तातडीने आरोपींचा माग घेतला. आणि अवघ्या काही तासातच आरोपींना जेरबंद केलं. दोन्ही आरोपी दिल्लीचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ते कुठे राहत होते, ते हत्या करण्यासाठी दिल्लीवरून आले होते का? याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींनी प्रेम प्रकरणातून कोमलची हत्या केली असावी, असा अंदाज केला जात आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. पण एका १८ वर्षीय तरुणीची अशाप्रकारे परप्रांतीय तरुणांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
May 12, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
पुण्याच्या कोमल जाधवची परप्रांतीय तरुणांकडून हत्या, दोघांनी घराखाली बोलवलं अन्... घटना CCTV मध्ये कैद