पुणे हादरलं! बाइकवरून आले अन् सपासप वार केले, पिंपरीत मध्यरात्री रक्तरंजित राडा

Last Updated:

Crime in Pimpri Chinchwad: पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी भागात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

News18
News18
गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील दिघी भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. इथं एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी संबंधित मुलावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
निलेश शिंदे, शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. तर सोहम सचिन शिंदे असं हत्या झालेल्या १७ वर्षीय मुलाचं नाव आहे. आरोपींनी जुन्या भांडणा कारणातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजता सोहम आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी घटना स्थळी आलेल्या आरोपींनी सोहमची निर्घृण हत्या केली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोहम हा घटनेच्या वेळी दिघी वरमुखवाडी येथील केकीज या केकच्या दुकानासमोर मित्रांशी गप्पा मारत बसला होता. यावेळी अचानक दुचाकीवर काहीजण तिथे आले. त्यांनी एक वर्षापूर्वी झालेल्या वादातून सोहमला शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवत तिघांना बेड्या ठोकल्या. निलेश शिंदे , शुभम पोखरकर , सुमित शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पुणे हादरलं! बाइकवरून आले अन् सपासप वार केले, पिंपरीत मध्यरात्री रक्तरंजित राडा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement