Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; आठवड्यात आनंदी-आनंद पण..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा पूर्ण आठवडा काही राशींसाठी खास असेल, तर काहींनी काळजी घ्यावी. या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीत लक्षणीय बदल होतील, ज्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक परिस्थिती, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनावर होईल. धनु राशीतील ग्रहांची भव्य युती आणि चंद्राचे विविध राशींमधून भ्रमण यामुळे अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत. याचा सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींवरील साप्ताहिक परिणाम जाणून घेऊ.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल. तुम्ही बराच काळ बेरोजगार असाल, तर या आठवड्यात मनासारखी नोकरी किंवा उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. उच्च शिक्षण किंवा परदेशातील व्यवसायासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. परदेश प्रवासातून किंवा त्यासंबंधित कामातून धनलाभाचे योग आहेत. आयुष्यात पुढं जाण्यासाठी मोठ्या संधी मिळतील. सरकारी कामात असलेल्या लोकांशी तुमचे संबंध येतील आणि त्यांच्या मदतीनं प्रलंबित कामं पूर्ण होतील. राजकारण किंवा समाजसेवेशी संबंधित असाल, तर तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढेल. समाजात तुमची कीर्ती पसरेल. नात्यांच्या बाबतीत हा आठवडा पूर्णपणे अनुकूल आहे. जोडीदाराशी चांगलं ट्युनिंग राहील आणि वैवाहिक आयुष्य सुखी असेल. उत्तरार्धात जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील.लकी रंग: क्रीम लकी अंक: 9
advertisement
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम असेल. आठवड्याच्या सुरुवातीला नियोजित कामं पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात. नातेवाईकांकडून अपेक्षेनुसार मदत न मिळाल्यानं थोडं वाईट वाटू शकतं. प्रयत्नांचं फळ न मिळाल्यानं मनात खिन्नता येऊ शकते. पूर्वार्धात केवळ नात्यांच्या बाबतीतच नाही तर आरोग्याच्या बाबतीतही काळजी घेण्याची गरज आहे. जुने आजार किंवा हंगामी आजार डोकं वर काढू शकतात.
advertisement
advertisement
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनात नवीन संधी घेऊन येईल. नशीब तुमच्या दारावर दस्तक देईल, पण त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा लागेल. जे परदेशात शिक्षण किंवा व्यवसायासाठी जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मोठं यश मिळू शकतं. परदेशी व्यापाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा आठवडा शुभ आहे. नोकरीत उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. हव्या त्या ठिकाणी बदली किंवा सन्मानाचं पद मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. नात्यांच्या बाबतीत वेळ अनुकूल आहे, भावंडांशी आणि पालकांशी संबंध मधुर राहतील. उत्तरार्धात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळं घरात आनंदाचं वातावरण असेल. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. आरोग्य सामान्य राहील.
advertisement
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असेल. या आठवड्यात कोणतीही जोखीम घेणं किंवा नियम मोडणं टाळावं, अन्यथा विनाकारण अडचणीत येऊ शकता. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी खोट्याचा आधार घेऊ नका, अन्यथा मानहानी सहन करावी लागेल. भावनेच्या भरात किंवा दबावाखाली कोणासाठीही खोटी साक्ष देण्याची चूक करू नका, अन्यथा कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतील.
advertisement
वृश्चिक - व्यवसायात स्पर्धकांशी कडवी झुंज द्यावी लागेल आणि बाजारपेठेत आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बाजारात अडकलेले पैसे काढण्याबाबत चिंता वाटू शकते. वैयक्तिक आयुष्यात असलेल्या समस्यांवर उत्तरार्धात काहीतरी तोडगा निघेल. ज्येष्ठ व्यक्ती किंवा जवळच्या मित्राच्या मदतीने नातेवाईकांमधील गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंधात सावधगिरीने पावलं उचला आणि घाईत चूक करू नका.लकी रंग: मरून लकी अंक: 12








