8 दुचाकी आणि 3 गाड्यांचे सांगाडे जप्त
पोलिसांनी आरोपीकडून एकूण 8 दुचाकी आणि 3 गाड्यांचे सांगाडे जप्त केले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचा तपास सुरू असताना हरिभाई प्रशालेच्या मागे साहिल संशयास्पद रित्या फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला एका दुचाकीसह पकडले. चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
advertisement
11 गाड्या चोरल्याचे उघड
चौकशीत साहिलने एकूण 11 दुचाकी चोरल्याचे उघड झाले. तो दुचाकी चोरून मित्रांकडे किंवा इतर ठिकाणी ठेवत असे. त्यानंतर तो गाडीचे वेगवेगळे पार्ट करून ते विकायचा, असे पोलिसांनी सांगितले. त्याने चोरी केलेल्या गाड्यांपैकी 6 गाड्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, 2 एमआयडीसी आणि 1 फौजदार चावडी जेलरोज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. अजून एका चोरीचा तपास सुरू आहे.
साहिल चोरीच्या गाडीचे पार्ट वेगळे करण्यासाठी बाबू बागवान याला 500 रुपये देण्याचे ठरले होते, पण त्याने त्याला 400 रुपये दिले, ही माहिती तपासात उघड झाली. वडील मेहबुब शहापुरे यांनी गाडीचे पार्ट वेगळे करण्यासाठी जागा वापरू दिली, तसेच चोरीच्या भंगार वस्तू विकत घेतल्याबद्दल रहीम शेख आणि चोरीत मदत केल्यामुळे बाबू बागवान या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : Crime: दारूवरून पेटला वाद, रेल्वेरुळावर आपटलं डोकं, एका मिनिटांत 'त्या' भंगारवाल्याचा खेळ खल्लास!
हे ही वाचा : हाण की बडीव! 2 तृतीयपंथींच्या गटात तुफान हाणामारी; पोलिसांच्याही अंगावर गेले धावून आणि मग...