मृत पतीचे नाव कैलास सरवदे असे आहे. सात वर्षांपूर्वी त्याचा माया नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. मायाचे हे दुसरे लग्न असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, विवाहानंतर पती–पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. कैलास हा नेहमी दारूचे सेवन करायचा. दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याचे पत्नीशी भांडण होत असे. गेल्या काही दिवसांपासून अशा वादांची तीव्रता वाढली होती.
advertisement
पतीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण
दरम्यान, शनिवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर मायाने कैलासला लाथा–बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये कैलास गंभीर जखमी झाला. तो बेशुद्ध पडताच नातेवाईकांनी त्याला तात्काळ अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मी याला फुकट सांभाळायचं का? नवऱ्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण
माया नवऱ्याला नेहमी उपाशी ठेवत असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. माया हिने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व प्रायव्हेट पार्टवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी व शेजाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने त्यांना थेट सांगितलं की, 'तुम्ही हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारु पिऊन असाच करतो, मी याला फुकट सांभाळायचं का?' असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली.
पत्नी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालात मारहाणीमुळे झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी आरोपी पत्नी माया हिच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वैवाहिक वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हिंसाचारात झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा :
मुलीच्या बॉयफ्रेंडलाच पटवलं, जाळ्यात ओढताच बनवला मास्टर प्लान, मुंबईच्या महिलेचा खतरनाक खेळ!