अश्विनीचं एका दुसऱ्याच मुलावर जीवापाड प्रेम होतं. काही दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता. त्यांचं पाच वर्षांचे प्रेमसंबंध होते. याच विरहातून अश्विनीने आपला मानलेला भाऊ रोहितसोबत गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. एकावर जीवापाड प्रेम असताना दुसऱ्यासोबत गळफास घेतल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे. ज्या मुलासाठी अश्विनीने आत्महत्या केली. त्या मुलाचं नाव आदित्य आहे. आदित्य हा रोहितचा शाळेपासूनचा मित्र आहे. अश्विनी आणि आदित्यच्या प्रेमाबद्दल रोहितला माहीत होतं.
advertisement
रोहित अश्विनी बहीण मानायचा. आदित्यसोबत अश्विनीचा झालेल्या ब्रेकअपमुळे रोहितही दुखावला होता. घटनेच्या दिवशी रोहित आणि अश्विनी दोघंही कर्णिकनगरमधील एका घरात भेटले. यावेळी अश्विनीने आपण आत्महत्या करणार असल्याचं रोहितला सांगितलं. अश्विनीचा मृत्यू झाल्यानंतर आपण तरी जगून काय करायचं? या विरहातून त्यानेही मानलेली बहीण अश्विनीसोबत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनी घरातील सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबतची सर्व माहिती सुसाईड नोटमधून समोर आली आहे.
सुसाईड नोटमध्ये नक्की काय लिहिलं?
आम्ही दोघं बहीण-भाऊ आहोत. आई मुलगा आहोत. आम्हा दोघांना मेलेले बघून वाईट समजून घेऊ नका. जीवन जगायला नको वाटतं. त्यामुळे सगळ्यांपासून लांब चाललो, आमच्या दोघांच्या नात्याचा कोणीही वाईट अर्थ लावू नका. आम्हाला बघितल्यावर पहिले आदित्यला बोलवा. कारण आम्ही कोण आहोत, हे फक्त तोच सांगू शकतो. माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही दोघं खूप रडून जीवन नको म्हणून आत्महत्या केली.
जिवंत असताना आम्हाला खूप जणांनी लांब करण्याचा प्रयत्न केला. पण मेल्यावर तरी आम्हाला सोबत जाळा. आदि तुला वाटतं तसं नैना चांगली नाही. ती कशी आहे ना ते तू एकदा स्वतः पडताळून बघ. त्या दिवशी भांडण झाला ना, त्या भांडणात आम्ही जे बोलो ते खरं होतं. ते तुला नंतर कळेल. Best of luck aadi for your future. तसंच माझ्या मम्मी पप्पाला सांगा की मी जीवनाला कंटाळून गेले. जगण्याची इच्छा मेली होती. vivo फोनमध्ये रेकॉर्डिंग आहेत, ते फक्त पोलीस ऐका, आणि त्या मुलीला बोलावून विचारा. आणि आमच्या मरण्याचे कारण पण तीच आहे. कारण तिने मला आणि आदिला लांब केलं, स्वतःच्या स्वार्थासाठी. आदि जाता जाता लास्ट टाईम तुला एक सांगते, आदि सत्य कडू असताय. एवढं लक्षात ठेव. मी मेलावरही तुला विसरू शकणार नाही. जमलं तर माझ्या माथ्यावर कुंकू लावून जा. पप्पा मम्मी मी मरत आहे. कारण मी जगून पण तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मेले तर तुम्हाला जरा बरं वाटेल. माझ्या घरचे आणि आदिची यात काहीच चूक नाही.