...अशी घडली धक्कादायक घटना
या घटनेतील आरोपी नीलेश राजाराम मोहिते (वय-45) असे नाव आहे. हा माजी सैनिक आहे. अशोक पाटील (वय-40) हे गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सकाळी दाजी अशोक पाटील आणि मेहुणा मोहिते यांच्या जोरदार वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या मेहुण्याने 2 गोळ्या दाजीच्या दिशेने झाडल्या. त्यात एक होळी दाजीच्या उजव्या मांडीला लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने यशवंत आयुर्वेदिक दवाखान्यात दाखल करण्यात आले.
advertisement
पोलिसांनी असा केला खुलासा
या धक्कादायक घटनेनंतर ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. पहिल्यांदा मोहिते याने पिस्लूलची साफसफाई करताना चुकून गोळी लागली, असा बनाव रचला. त्यामुळे घटनास्थळी पोहोचलेले पोलिसही संभ्रमावस्थेत होते. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवीद्र करमळकर यांनी कसून चौकशी केल्यानंतर मेहुणा विनोद पाटील यांनी कबूल केले की, 10 वर्षांपूर्वी बहिणीशी केलेल्या लव्ह मॅरेजमुळे हा गोळीबार केला.
हे ही वाचा : आई झोपताच साधला डाव, नराधमाने चिमुकलीला रेल्वे स्थानकावरून उचललं अन्.., बीडला हादरवणारी घटना
हे ही वाचा : पोराचा कांड, आईला धक्का! स्वतःच्या घरात टाकला डाका; तिजोरीतलं झाडून नेलं सगळं सोनं