पोराचा कांड, आईला धक्का! स्वतःच्या घरात टाकला डाका; तिजोरीतलं झाडून नेलं सगळं सोनं

Last Updated:

Satara News : या प्रकरणातील मुलाचे नाव अक्षय विलास मोरे (वय-२५) असून त्याच्याविरुद्ध आई हेमा विलास मोरे (वय-42, रा. बेबलेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणातील...

Satara News
Satara News
Satara News : साताऱ्यातील बेबलेवाडी परिसरातील 25 वर्षांच्या मुलाने मित्राला सोबत घेऊन स्वतःच्याच घरात घरफोडी केली. त्यामुळे 6 लाखांचे 8 तोळे सोने संपास केले. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वतःच्याच घरी चोरी करणाऱ्या मुलाविरुद्ध आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
मुलाने एकूण 13 ग्रॅम सोन्याची केली चोरी
या प्रकरणातील मुलाचे नाव अक्षय विलास मोरे (वय-२५) असून त्याच्याविरुद्ध आई हेमा विलास मोरे (वय-42, रा. बेबलेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणातील समोर आलेली माहिती अशी की, ही चोरी मार्च 2025 मध्ये घडली होती. चोरट्यांनी 5 लाखांचे 5 तोळ्यांचे सोन्याचे गंठण, 40 हजारांची 12 ग्रॅम वजनाचे मोहन माळ, 72 हजार रुपयांची 4 ग्रॅमची अंगठी, तसेच टाॅप्स, सोन्याच्या रिंग्ज, असा एकून 12 ग्रॅमचा सोन्याच्या दागिन्यांची चोरी केलेली होती.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी काय केले? 
चोरीचा गुन्हा पोलिसांत दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. या तपासात अक्षयला ताब्यात घेण्यात आले. ज्यावेळी त्याला पोलिसी खाक्या दाखवला, त्यावेळी त्याने स्वतःच्या घरात चोरी केल्याचे कबूल केले. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्राचा शोध सुरू आहे. त्याचबरोबत चोरलेले सोने कुठे ठेवले किंवा कुठे विकले, यासंदर्भात अजून पोलीस तपास करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पोराचा कांड, आईला धक्का! स्वतःच्या घरात टाकला डाका; तिजोरीतलं झाडून नेलं सगळं सोनं
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement