कल्पाकांचेरी पोलिसांनी एडक्कुलम येथील रहिवासी शाहुल हमीद याच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पत्नीवरील मानसिक आणि शारीरिक छळ
तक्रारीनुसार, शाहुल हमीद याने २१ वर्षीय पत्नीशी २०२१ मध्ये विवाह केला. मात्र, लग्नाच्या काही काळानंतरच तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. अधिक हुंडा मिळावा यासाठी पती आणि त्याच्या कुटुंबाने वारंवार तिच्यावर दबाव टाकला.
advertisement
माझ्या नवऱ्याला सुख दे, मी तुला...; पत्नीचा विकृत प्लॅन पाहून पोलिस चक्रावले
पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शाहुल हमीदने आपल्या आईच्या उपस्थितीत फोनवरून तिला तलाक दिला. यामुळे पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
कॉफी स्टोअर्सची Hot चूक, ग्राहकाच्या गुप्तांगाला दुखापत, झालं तरी काय?
पोलिस तपास सुरू
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी शाहुल हमीद याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. केरळमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिस अधिक सतर्क झाले असून पीडित महिलांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.