कॉफी स्टोअर्सची Hot चूक, ग्राहकाच्या गुप्तांगाला दुखापत, झालं तरी काय? कोर्टाने केला 4,34,74,20,000 रुपयांचा दंड
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
अमेरिकेतील न्यायालयाने स्टारबक्सला एका ग्राहकाला ५० मिलियन डॉलर (सुमारे ४३४ कोटी रुपये) नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. गरम कॉफीच्या झाकणामुळे ग्राहक गंभीर भाजल्याने ही कारवाई करण्यात आली.
नवी दिल्ली: अमेरिकेतील एका न्यायालयाने मल्टीनॅशनल कॉफी चेन स्टारबक्सला एका डिलिव्हरी ड्रायव्हरला 5 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 4,34,74,20,000 रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
लॉस एंजेलिसमधील स्टारबक्सच्या एका आऊटलेटवर ड्रायव्हरने कॉफी घेतली होती. या प्रकरणात कॉफीच्या कपाचे झाकण योग्यरित्या बंद नसल्याचा आरोप आहे. अचानक गरम कॉफी ड्रायव्हरच्या मांडीवर पडली, त्यामुळे त्याला गंभीर भाजले गेले. यामुळे ड्रायव्हर गुप्तांगाला विकृती आली आणि नसांनाही गंभीर दुखापत झाली. या खटल्यात स्टारबक्सवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता.
स्टारबक्सला 50 दशलक्ष डॉलर्सचा दंड
कॅलिफोर्नियातील एका ज्युरीने स्टारबक्सला मायकल गार्सिया नावाच्या ड्रायव्हरला 50 दशलक्ष डॉलर्स देण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गार्सियाचे वकील मायकल पार्कर यांनी सांगितले की, त्यांचे क्लायंट गार्सिया यांना कॉफीचा ऑर्डर दिला गेला तेव्हा त्याचे झाकण नीट बंद नव्हते. त्यामुळे गरम कॉफी गार्सियावर पडली. गार्सियाला शारीरिक वेदनांसोबतच मानसिक वेदनाही झाल्या. यासोबतच त्याला निराशा, अपमान, गैरसोय, दुःख, विकृती, शारीरिक नुकसान आणि भावनिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली.
advertisement
स्टारबक्स अपील करणार
दरम्यान स्टारबक्सने सांगितले की, कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध अपील केली जाईल. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्हाला गार्सियाबद्दल सहानुभूती आहे, परंतु या घटनेसाठी आम्ही दोषी आहोत. या ज्युरीच्या निर्णयाशी आम्ही असहमत आहोत. आम्हाला वाटते की नुकसानभरपाई खूप जास्त आहे. गरम पेये हाताळण्यासह कंपनी नेहमीच त्यांच्या स्टोअर्समध्ये उच्च सुरक्षा मानकांसाठी वचनबद्ध आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 15, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कॉफी स्टोअर्सची Hot चूक, ग्राहकाच्या गुप्तांगाला दुखापत, झालं तरी काय? कोर्टाने केला 4,34,74,20,000 रुपयांचा दंड