लग्न नाही केलंस तर मारून टाकीन
सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर तरुणाने तरुणीचे फोटो कॉपी करून एडिट केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड करत तिची बदनामी केली. ‘माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुला जिवे मारून टाकीन,’ अशी धमकी देत आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात सापडली. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने सिटी चौक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
मुलगी का झाली? पतीने फोनवरून उच्चारले ‘ते’ तीन शब्द, पत्नीची पोलिसांत धाव, छ. संभाजीनगरची घटना
गर्भपात अन् आत्महत्येची धमकी
विवाहित असल्याची माहिती लपवून एका व्यक्तीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ती महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले. काही दिवसांनी पुन्हा ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नासाठी तगादा लावला. नाते उघड होण्याच्या भीतीने आरोपीने तिला आत्महत्येची धमकी दिली. या मानसिक छळाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






