प्रेम, लग्न अन् धोका! सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; संभाजीनगरमध्ये दोघींच्या आयुष्याचा खेळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: प्रेम, लग्न आणि विश्वास यांचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याच्या दोन धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात पुढे आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावरील ओळख आणि लग्नाच्या आमिषातून महिलांची फसवणूक, मानसिक छळ आणि गंभीर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत. प्रेम, लग्न आणि विश्वास यांचा गैरवापर करत महिलांवर अत्याचार केल्याच्या दोन धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आल्या असून, दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
लग्न नाही केलंस तर मारून टाकीन
सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर तरुणाने तरुणीचे फोटो कॉपी करून एडिट केले आणि ते सोशल मीडियावर अपलोड करत तिची बदनामी केली. ‘माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुला जिवे मारून टाकीन,’ अशी धमकी देत आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात सापडली. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरण गंभीर असल्याने सिटी चौक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
गर्भपात अन् आत्महत्येची धमकी
विवाहित असल्याची माहिती लपवून एका व्यक्तीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ती महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले. काही दिवसांनी पुन्हा ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नासाठी तगादा लावला. नाते उघड होण्याच्या भीतीने आरोपीने तिला आत्महत्येची धमकी दिली. या मानसिक छळाला कंटाळून पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
प्रेम, लग्न अन् धोका! सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; संभाजीनगरमध्ये दोघींच्या आयुष्याचा खेळ










