TRENDING:

सासरची Gift भारी का माहेरची? मुलाच्या बर्थडेनंतर पतीचा घरात तमाशा, पत्नी-सासूचा खेळ खल्लास!

Last Updated:

मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरामध्ये झालेल्या वादातून पतीने त्याची पत्नी आणि सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Crime : मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरामध्ये झालेल्या वादातून पतीने त्याची पत्नी आणि सासूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन जणांची हत्या झाल्याबद्दल रविवारी दुपारी 3.50 च्या सुमारास पोलिसांना पीसीआर कॉल आला, यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा कुसुम सिन्हा (वय 63) आणि तिची मुलगी प्रिया सेहगल (वय 34) यांचे मृतदेह एका खोलीमध्ये पडलेले आढळले.
सासरची Gift भारी का माहेरची? मुलाच्या बर्थडेनंतर पतीचा घरात तमाशा, पत्नी-सासूचा खेळ खल्लास! (Meta AI Image)
सासरची Gift भारी का माहेरची? मुलाच्या बर्थडेनंतर पतीचा घरात तमाशा, पत्नी-सासूचा खेळ खल्लास! (Meta AI Image)
advertisement

कुसुमचा मुलगा मेघ सिन्हा (वय 30) यानेच पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं होतं. आपली आई 28 ऑगस्टला नातू चिरागच्या वाढदिवसानिमित्त मुलगी प्रियाच्या घरी गेली होती, असं मेघ याने पोलिसांना सांगितलं. वाढदिवसाला दोन्ही बाजूंकडून आलेल्या गिफ्टवरून प्रिया आणि तिचा पती योगेश सेहगल यांच्यात वाद झाले. हे प्रकरण सोडवण्यासाठी योगेशची सासू कुसुम हिने घरीच थांबण्याचा निर्णय घेतला.

advertisement

दोन दिवस मेघचा त्याच्या आईसोबत संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा तो बहीण प्रियाच्या घरी गेला. तेव्हा त्याला फ्लॅट बाहेरून बंद आढळला आणि दाराजवळ रक्ताचे डाग दिसले. यानंतर मेघने नातेवाईकांच्या मदतीने कुलूप तोडलं, तेव्हा त्याला फ्लॅटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन महिला मृत आढलल्या. बेरोजगार असलेल्या योगेशने दोघींची हत्या केली आणि मुलाला घेऊन तो पळाल्याचा आरोप मेघने केला आहे.

advertisement

याप्रकरणी पोलिसांनी योगेशला अटक केली आहे. योगेशचे रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेल्या कात्री जप्त केल्या आहेत. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच फॉरेन्सिक टीम आणि गुन्हे शाखेला घटनास्थळी बोलावण्यात आलं असून अधिक चौकशी सपरू आहे.

कुसुमने प्रिया आणि योगेश यांच्यातलं भांडण मिटवून आपण घरी येऊ, असं घरी फोन करून सांगितल्याचं प्रियाचा भाऊ हिमालय याने पीटीआयसोबत बोलताना सांगितलं आहे. 'आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फोन करत राहिलो, पण तिने आणि माझ्या बहिणीने फोन उचलला नाही. शेवटी आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला कुलूपावर रक्ताचे डाग दिसले,' असं तो म्हणाला.

advertisement

'माझ्या मेहुण्याने दोघींची हत्या केली आणि तो मुलाला घेऊन पळून गेला. नवरा-बायकोमध्ये भांडणं होतात, पण असं कोण करतं? 17 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. हे अमानवीय कृत्य आहे, योगशेला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे', अशी प्रतिक्रिया प्रियाच्या भावाने दिली आहे. दिल्लीच्या रोहिणी भागामध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
सासरची Gift भारी का माहेरची? मुलाच्या बर्थडेनंतर पतीचा घरात तमाशा, पत्नी-सासूचा खेळ खल्लास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल