या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिम येथील 'कृष्णा क्लासिक' या इमारतीत म्हात्रे कुटुंब राहत आहे. त्यांच्याकडे 'चॉकलेट' नावाचं मांजर पाळलेलं होतं. घरामध्ये साफसफाई करत असताना ते आपल्या मांजराला फ्लॅटसमोर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये खेळण्यासाठी सोडत होते. रविवारी नेहमीप्रमाणे त्यांनी मांजराला फ्लॅटसमोर सोडलं होतं. काही वेळानंतर मांजर बेपत्ता झाली असता म्हात्रे कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. त्यांचं मांजर इमारतीखाली मृतावस्थेत सापडलं. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने म्हात्रेंनी फ्लॅटबाहेर लावलेले सीसीटीव्ही तपासले. त्याच इमारतीमध्ये राहणारे विलास पाठारे हे मांजराला मारहाण करून काठीने पाचव्या मजल्यावरून ढकलताना दिसले. या प्रकारामुळे संतापलेल्या म्हात्रेंनी पोलीस तक्रार दिली.
advertisement
विद्यापीठात आढळला प्राण्याचा सांगडा
दुसऱ्या एका घटनेमध्ये, मुंबई विद्यापीठाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीलजवळ सोमवारी एका मृत जनावराची कातडी आणि सांगाडा सापडला. याबाबत माहिती मिळताच, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हे अवशेष ताब्यात घेतले. प्राण्याची कत्तल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.