ही घटना हरियाणातील पानिपत येथील आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेवर वेश्याव्यवसायाचा आरोप केला आहे. सदर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पीडित तरुणीने सांगितलं की, "ती एका वसाहतीत राहते. तीन दिवसांपूर्वी ती रिफायनरी रोडवरील जंगलातून लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती, जिथे जवळच्या गावातील अनेक महिला लाकूड आणि गवत गोळा करण्यासाठी येतात."
advertisement
'तुला तिघांसोबत लैंगिक संबंध ठेवावे लागतील'
त्या दिवशी ती लाकूड गोळा करायला गेली असता, त्या परिसरात तिची किरण नावाच्या महिलेशी भेट झाली. जी पत्रकार असल्याचा दावा करत होती. तिच्यासोबत इतर तीन तरुण होते. त्यांनी स्वतःची ओळख अमन, अश्वनी आणि मास्टर संदीप अशी करून दिली. हे चौघेही एका कारमधून आले होते. यावेळी किरणने सांगितलं की, "तू येथे घाणेरडे काम करतेस. तुला या तीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवावे लागतील."
जंगलात घेऊन जात आळीपाळीने केला अत्याचार
पण पीडितेनं संबंधित ठेवण्यास नकार दिला. यावेळी चारही आरोपींनी पीडितेशी जबरदस्ती करत तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी जंगलात नेली. निर्जन ठिकाणी गेल्यानंतर तिघांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी पीडितेनं विरोध केला असता आरोपींनी तिला मारहाण केली. हा सगळा प्रकार घडत असताना महिला यूट्यूबर घटनास्थळापासून काही अंतरावर हातात काठी घेऊन पाळत ठेवत होते. जेणेकरून इतर कोणीही तिथे येऊ नये.
सामूहिक अत्याचारानंतर VIDEO शूट केला
आरोपी सामूहिक अत्याचापर्यंत थांबले नाहीत. त्यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला. घडलेला प्रकार कुणालाही सांगितला तर तुझा व्हिडीओ मीडियामध्ये प्रसारित करून बदनामी करू, अशी धमकी देखील दिली. दरम्यान, या परिसरात इतर चार ते पाच महिला लाकूड गोळा करण्यासाठी आल्या. या सर्वांना पाहून चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी आता सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.