शंकरच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं
लग्नानंतर काही दिवसांनी शंकरने खुशबूला हनिमूनला जाण्याचा विचार बोलून दाखवला. "चल, काही दिवस एकत्र फिरायला जाऊ, खूप मजा येईल," तो म्हणाला. खुशबूला हे ऐकून खूप आनंद झाला. तिने त्वरेने बॅग भरली आणि दोघेही उत्तर प्रदेशातून झारखंडकडे निघाले. तिथे त्यांनी अनेक सुंदर आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी ते मनसोक्त फिरले, पण खुशबूला कुठून माहीत असणार की शंकरच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं?
advertisement
धावत्या रेल्वेच्या डब्यातून दिलं ढकलून
परतीच्या प्रवासात त्यांनी बनारस-बरकाना पॅसेंजर ट्रेन पकडली. रात्र होती आणि गाडी आपल्या वेगाने धावत होती. शंकर खुशबूशी गोड बोलत तिला ट्रेनच्या दरवाजाजवळ घेऊन गेला. खुशबूही आनंदाने त्याच्यासोबत गेली, पण पुढच्याच क्षणी जे घडलं ते धक्कादायक होतं. अचानक, शंकरने खुशबूला जोरदार धक्के मारायला सुरुवात केली. घाबरलेल्या खुशबूने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्याच्या पाया पडली, "शंकर, तू हे काय करतोयस? मला सोडू नकोस!" ती कळवळून विनवणी करत होती, पण शंकरने तिचं काहीही ऐकलं नाही. त्याने तिला इतक्या ताकदीने ढकललं की ती धावत्या ट्रेनमधून खाली फेकली गेली!
गावकऱ्यांनी उचललं अन् दवाखान्यात नेलं
खुशबू एका नाल्यात पडली. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं आणि ती वेदनेने किंचाळत होती. तिची बरगडी मोडली होती आणि पायांनाही गंभीर जखमा झाल्या होत्या. नशिबाने, काही वेळाने किरिगरहा गावातील काही लोक तिथून जात होते. त्यांनी खुशबूला नाल्यात पडलेलं पाहिलं आणि क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ला माहिती दिली. RPF चे कर्मचारी आकाश पासवान यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला बोलावले.
शुद्धीवर आली आणि नवऱ्याचा कांड सांगितला
खुशबूला आधी पातराटू येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आणि तिथून प्राथमिक उपचारानंतर रामगढ सदर रुग्णालयात पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी तिची प्रकृती खूप चिंताजनक असल्याचं सांगितलं आणि तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तिचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करत होते. जेव्हा खुशबूला शुद्ध आली, तेव्हा तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. शंकर गोरखपूरचा असून, एक वर्षापूर्वीच तिने त्याच्याशी लग्न केल्याचं तिने सांगितलं. पण आता तिला आपल्या या निर्णयाचा खूप पश्चात्ताप होत होता. पोलिसांनी खुशबूचा जबाब नोंदवून शंकरचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा : 2 बायका, 20 गर्लफ्रेंड आणि 10 महिलांशी शारीरिक संबंध! वर्दीचा वापर करून या माणसाने केला कहर!
हे ही वाचा : गावकऱ्यांचा कांड! पतीचा मित्र अन् 6 मुलांची आई, लावलं जबरदस्तीने लग्न; पण सत्य कळताच उडाली सर्वांची झोप