लक्ष्मीची हत्या करण्याआधी रात्री किशनने तिला उजळ बनवण्यासाठी एक क्रीम आणल्याचं तिला सांगितलं. हे क्रीम अंगाला लावण्याचा आग्रह किशनने धरला, लक्ष्मीनेही किशनचं म्हणणं ऐकलं आणि क्रीम संपूर्ण शरिराला लावलं. किशनने लक्ष्मीला दिलेलं हे क्रीम त्वचा उजळ करण्याचं नाही तर ज्वलंत होतं. लक्ष्मीने हे क्रीम शरिराला लावल्यानंतर किशनने घरातल्या काडेपेटीने आग लावली आणि ती काडेपेटी लक्ष्मीच्या शरिरावर फेकली, त्यामुळे लक्ष्मीच्या शरिराने पेट घेतला.
advertisement
गंभीर जळालेल्या अवस्थेमध्येच लक्ष्मीने दंडाधिकाऱ्यांना आपल्याला पती किशनने जाळल्याचं जबाबामध्ये सांगितलं. यानंतर न्यायालयाने लक्ष्मीचा जबाब आणि 14 साक्षीदारांच्या साक्षीला ग्राह्य धरलं आणि किशनला फाशीची शिक्षा सुनावली.
राजस्थानच्या मावली येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे कृत्य क्रूर, जाणूनबुजून आणि पूर्वनियोजित असल्याचं त्यांच्या निकालात म्हणलं आहे. किशनचा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं सांगत न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. किशन लाल याला कलम 302 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने पुष्टी केल्यानंतर किशन लाल याला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. याशिवाय किशनला 50 हजार रुपयांचा दंड आणि एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षाही सुनावली आहे.