30 वर्षांच्या कविता हिला शनिवारी पोलिसांनी अटक केली. पतीच्या वडिलांनी पोलिसांना मुलाची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना दिली. संजय कुमार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो 40 वर्षांचा आहे. संजय कुमार याची दुसरी पत्नी कविताने ही हत्या केल्याचं स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) दिनेश चंद भागेल यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितलं. संजय कुमार याचे वडील भोपाल सिंग यांनी पोलिसांना मुलाची हत्या झाल्याची तक्रार दिली होती.
advertisement
कविताने संजय झोपेत असतानाच त्याचा गळा दाबल्याचं चौकशीदरम्यान समोर आलं आहे. संजय आणि कविता यांचे 2000 साली लग्न झाले होते, तर संजयची पहिली पत्नी तांडा माजरा येथे त्याच्या मूळ गावी राहत होती. पहिल्या पत्नीसाठी आपल्याला वेळ देत नाही, म्हणून कविताने मुझफ्फरनगर येथील घरामध्ये संजय झोपलेला असताना त्याचा गळा दाबला आणि त्याला संपवलं.
सासरची Gift भारी का माहेरची? मुलाच्या बर्थडेनंतर पतीचा घरात तमाशा, पत्नी-सासूचा खेळ खल्लास!
दुहेरी हत्याकांडाने राजधानी हादरली
दुसरीकडे दिल्लीच्या रोहिणी भागामध्ये पतीने पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. मुलाच्या वाढदिवसानंतर सासरची गिफ्ट चांगली का माहेरची, यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला, पण हा वाद सोडवण्यासाठी सासूही थांबली. यानंतर पतीने पत्नी आणि सासूची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.