सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भयानक व्हिडीओमध्ये आरोपी अनिल कनोजिया आपल्या बायकोचं डोकं घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. एका हातात रक्ताने माखलेले डोके आणि दुसऱ्या हातात चॉपर घेऊन या व्यक्तीला फिरताना पाहून लोकांना आश्चर्य वाटले.
हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील आहे. येथे गेल्या शुक्रवारी ही घटना घडली. हा व्यक्ती आपल्या बायकोचं डोकं घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेला, ज्यानंतर त्याला पोलिसांकडून अटक झाली.
advertisement
बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बसरा गावात राहणारा अनिल कनोजिया याच्यावर बायको वंदना हिच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिलला त्याच्या पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याचा संशय होता आणि यावरून दोघांमध्ये भांडण झाले.
शुक्रवारी सकाळी रागाच्या भरात अनिलने वंदनावर चॉपरने वार करून तिची हत्या केली. यानंतर रागाच्या भरात आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अनिल त्याचे कापलेले डोके घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने निघाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्याला वाटेतच अटक केली.
सोर्स : सोशल मीडिया
अनिल कनोजिया हा मजूर म्हणून काम करतो, त्याचा विवाह वंदनासोबत आठ वर्षांपूर्वी झाला होता आणि दोघांना दोन मुले आहेत. आपल्या पत्नीचे बाहेरील कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्याला पत्नीच्या प्रियकराचे कथित प्रेमपत्र मिळाल्याने हा संशय अधिक गडद झाला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनिलला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. अधिकाऱ्याने सांगितले की, पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
