तुझा चेहरा दाखव, तू कोण आहेस?
विपिन रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काल ( 8 जून 2025) रात्री राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांनी गोविंदला (सोनमचा भाऊ) फोन केला. सोनमने फोनवर 'मी बिट्टी बोलतेय, भाऊ' असे सांगितले. त्यावर आम्ही तिला आधी 'तुझा चेहरा दाखव, तू कोण आहेस?' असे विचारले. त्यानंतर सोनमने तिथून व्हिडिओ कॉल केला आणि तेव्हाच आम्हाला ती सोनम असल्याची खात्री पटली."
advertisement
पोलिसांना फोन केला अन्...
पुढील माहिती देताना विपिन रघुवंशी म्हणाले, "आम्ही लगेच उत्तर प्रदेश पोलिसांना फोन केला आणि ते तिथे पोहोचले व सोनमला त्यांच्यासोबत घेऊन गेले. ती फक्त तिथे बसली होती. पोलिसांनी तिला अटक केलेली नाही, आणि तिने आत्मसमर्पणही केलेले नाही. या सर्व अफवा पसरवल्या जात आहेत."
मेघालयचे डीजीपी सोनमला मारेकरी म्हणत असले तरी, 'सोनमची अद्याप व्यवस्थित चौकशीही झालेली नाही. तिला अधिकृतपणे काहीही सांगितले गेलेले नाही,' असा दावाही विपिन रघुवंशी यांनी केला आहे. यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सोनमच्या जबाबातून या प्रकरणातील अनेक रहस्ये उलगडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जेव्हा त्यांचं लग्न ठरलं तेव्हा सर्वजण खूप आनंदी होते. सोनम असे काही करू शकते असा आम्हाला कधीच संशय नव्हता. दोघांचा मेघालयला जाण्याचा कोणाचा बेत होता हे आम्हाला माहित नाही. त्यांनी परतीचं तिकीटही बुक केलं नव्हतं, असंही राजाच्या भावाने म्हटलं आहे.