पीएसआय पोटे हे एमआयडीसी पोलीस स्थानकात कार्यरत असताना दोघांमध्ये हा संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. पीएसआय पोटे यांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (डीसीआर) व संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, “पोटे व संशयित यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले असून, त्यात तूर्त तरी कोणतेही आक्षेपार्ह मजकूर आढळून आलेला नाही,”
advertisement
दरम्यान, पीएसआय पोटे यांची एक महिन्यापूर्वी एलसीबीतून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. या घडामोडींमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अबरार कुरेशी हा पीएसआय पोटे यांचा खबरी म्हणून काम करायचा असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. परंतु आता चौकशी अंतिम सत्य काय ते समोर येणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
