सासरचा छळ, जावयाची आत्महत्या
हेमंत पाटील आपल्या कुटुंबासह दोनगाव येथे राहत होते. काही दिवसांपासून त्यांची पत्नी गायत्री माहेरी मंगरूळ येथे निघून गेली होती. पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना, पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी हेमंत यांच्याकडे वारंवार पंधरा लाख रुपयांची मागणी केली. 'घटस्फोट दे नाहीतर पैसे दे,' अशा धमक्या त्यांना सातत्याने दिल्या जात होत्या. या सततच्या मानसिक छळामुळे आणि पैशांच्या दबावामुळे हेमंत पाटील यांनी 22 जुलै रोजी घरातून निघून पांढुर येथील रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली.
advertisement
सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल
घटनेनंतर सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र, पोलिसांनी तपास करून मृतदेह हेमंत पाटील यांचा असल्याचे निष्पन्न केले. हेमंत यांचे वडील अरुण विश्राम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नी आणि सासरच्या मंडळींनी सातत्याने मानसिक छळ केला आणि पैशांची मागणी केली, याच कारणामुळे हेमंत यांनी आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धरणगाव पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : 'तो' बोलू लागला बहिणीशी, भावाला झालं नाही सहन, डोक्यात फोडली बाटली अन् चाकूने केला वार...
हे ही वाचा : गुगल मॅपने केला घात, अरुंद रस्त्यावर ट्रक झाला पलटी; चालक बचावला, पण नुकसान झालं जास्त!