TRENDING:

मैत्री, नंतर जबरदस्ती संबंध, 'ती' अल्पवयीन राहिली गर्भवती, बाळाला जन्म देताच 'त्या' तरुणाचा कांड आला समोर

Last Updated:

जत तालुक्यातील काराजनगी गावातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सहदेव उर्फ प्रशांत गायकवाड (रा. काराजनगी) याने गेल्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जत (सांगली) : जत तालुक्यातील काराजनगी गावातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली आणि जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडित मुलीने स्वतः जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Sangli News
Sangli News
advertisement

मैत्रीतून केला अत्याचार

सहदेव उर्फ प्रशांत गायकवाड (रा. काराजनगी) या तरुणावर पोलिसांनी बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 (POCSO) च्या कलम 6, 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काराजनगी येथील सहदेव गायकवाड याने गेल्या एक वर्षांपासून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. याच मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ती गर्भवती राहिली.

advertisement

हे ही वाचा : विश्वासघात! कर्मचाऱ्यांनीच लावला फर्म मालकिणीला 41 लाखांना चुना; चार्टर्ड अकाउंटंटमुळे घोटाळा उघड

हे ही वाचा : खून की घातपात? बंद घरात आढळला महिलेचा सडलेला मृतदेह, तासगावात खळबळ!

मराठी बातम्या/क्राइम/
मैत्री, नंतर जबरदस्ती संबंध, 'ती' अल्पवयीन राहिली गर्भवती, बाळाला जन्म देताच 'त्या' तरुणाचा कांड आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल