खून की घातपात? बंद घरात आढळला महिलेचा सडलेला मृतदेह, तासगावात खळबळ!

Last Updated:

तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावातील अनिता पोपट मोहिते (वय-50) यांचा मृतदेह त्यांच्या मळ्यातील घरात सडलेल्या अवस्थेत आढळला. मुंबईत असलेल्या मुलीचा...

Sangali News
Sangali News
सांगली : तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावातून एक धक्कादायक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. गावातून काही अंतरावर एका मळ्यात एकट्या राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. हा खून आहे की आणखी काही, याबाबत गावात चर्चा सुरू आहे. गुरुवारी (दि. 7) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. अनिता पोपट मोहिते (वय-50) असे मृत महिलेचे नाव आहे.
मुलीच्या काळजीमुळे घटना उघडकीस
अनिता मोहिते या मांजर्डे गावाबाहेर एका मळ्यात एकट्याच राहत होत्या. त्यांची मुलगी मुंबईमध्ये राहते. गेले दोन दिवस ती आईला फोन करत होती, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मुलीने काळजीपोटी नातेवाईकांशी संपर्क साधला. गुरुवारी रात्री नातेवाईकांपैकी काहीजण अनिता यांच्या घरी गेले. घराच्या मुख्य दाराला आतून कडी होती, पण मागील बाजूचा दरवाजा उघडा होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, अनिता यांचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला.
advertisement
डोक्याला गंभीर दुखापत
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही बोलावण्यात आले. शुक्रवारी सकाळी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महागिर यांच्या पथकाने घटनास्थळीच मृतदेहाची तपासणी केली. या तपासणीत मृतदेहाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि डाव्या कानावरही जखमा आढळल्या.
advertisement
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 'व्हिसेरा' राखून ठेवला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच हा खून आहे की घातपात, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. अनिता मोहिते एकट्या राहत होत्या आणि आजूबाजूला इतर घरे नसल्यामुळे ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
खून की घातपात? बंद घरात आढळला महिलेचा सडलेला मृतदेह, तासगावात खळबळ!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement