बीडमध्ये वाल्मिक गँगची धतिंग, तरुणाला बेदम मारहाण अन् Video काढला, असं काही म्हणाला की... पाहा

Last Updated:

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाला धमकावून बळजबरीने माफी मागायला लावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Walmik Karad supporters forcing young man to apologize
Walmik Karad supporters forcing young man to apologize
Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाला धमकावून बळजबरीने माफी मागायला लावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणाला हात जोडून "अण्णा शिवाय पर्याय नाही.. अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही. माझी चूक झाली.." असे म्हणायला लावले जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा वाल्मीक कराड गँगची दहशत समोर आली आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हात जोडून माफी माग...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पांगरी गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एका तरुणाने केलेल्या पोस्टसंदर्भात त्याला धमकावले जात असल्याचे दिसत आहे. "अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही माझी चूक झाली.. हात जोडून माफी माग.." असा संवाद या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. माफी मागणारा तरुण स्पष्टपणे घाबरलेला दिसत आहे.
advertisement

वाल्मीक कराड गँगची एक्टिव?

देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या कारागृहात आहे. मात्र, ही घटना त्याच्या गँगची बाहेर सक्रियता दर्शवते का, असा सवाल या व्हिडिओमुळे उपस्थित होत आहे. कारागृहात असूनही त्याच्या नावाने अशा प्रकारे लोकांना धमकावले जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलीस तपासाची प्रतीक्षा

advertisement
दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळू शकली नाही. तसेच, हा व्हिडिओ कधीचा आहे, याबद्दलही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, समाज माध्यमांवर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
बीडमध्ये वाल्मिक गँगची धतिंग, तरुणाला बेदम मारहाण अन् Video काढला, असं काही म्हणाला की... पाहा
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement