विश्वासघात! कर्मचाऱ्यांनीच लावला फर्म मालकिणीला 41 लाखांना चुना; चार्टर्ड अकाउंटंटमुळे घोटाळा उघड

Last Updated:

सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असलेल्या 'श्री ईश्वर एजन्सी' या मेडिकल फर्ममध्ये 41 लाख 27 हजार रुपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फर्मची... 

Sangali Crime
Sangali Crime
सांगली : सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक मेडिकल फर्म कराराने चालविण्यास घेऊन तब्बल 41 लाख 27 हजार 314 रुपयांची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फर्मच्या मालक अर्चना सम्राट माने (वय-४०) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित कर्मचारी सविता दिनेश जाधव आणि त्यांचा पुतण्या विराज दिनेश जाधव या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वासाने सोपवली होती फर्मची जबाबदारी
फिर्यादी अर्चना माने यांची सिव्हिल हॉस्पिटल चौकात 'श्री ईश्वर एजन्सी' नावाची फर्म आहे. गेल्या 20 वर्षांपासून त्या हॉस्पिटल आणि मेडिकलसाठी लागणारे साहित्य व औषधे पुरवण्याचे काम करतात. आर्थिक अडचणींमुळे माने यांनी आपली फर्म चालवण्याची जबाबदारी 5 जुलै 2021 रोजी तोंडी कराराने सविता जाधव आणि विराज जाधव यांच्याकडे सोपवली होती.
advertisement
करारानुसार, औषधांच्या खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील 60 टक्के रक्कम जाधव यांना देण्याचे ठरले होते. 6 मार्च 2023 रोजी हा करार लेखी स्वरूपात करण्यात आला, ज्यात दरमहा एक लाख रुपये देण्याचेही निश्चित झाले. जाधव यांनी फर्ममधून पुरवलेल्या मालाची रक्कम वसूल करून ती फर्मच्या खात्यात जमा करणे अपेक्षित होते.
चार्टर्ड अकाउंटंटमुळे फसवणूक उघड
मोठ्या विश्वासाने फर्मची जबाबदारी जाधव यांच्यावर सोपवली असताना, फर्ममध्ये अफरातफर होत असल्याची बाब जून 2024 मध्ये चार्टर्ड अकाउंटंट विजय नावंदर यांनी अर्चना माने यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी लेखी पत्राद्वारे हिशेबात तफावत असल्याचे सांगितले.
advertisement
  • माने यांनी हिशेब तपासणी केली असता, 1 जुलै 2021 ते 15 मार्च 2024 या कालावधीत झालेली फसवणूक समोर आली.
  • हॉस्पिटल्स आणि मेडिकलमधून एकूण 75 लाख रुपये रोख रक्कम येणे अपेक्षित होती, पण खात्यावर फक्त 53 लाख 90 हजार रुपये जमा केले. उर्वरित 21 लाख 12 हजार रुपये जमा केले नाहीत.
  • ऑनलाइन पेमेंटद्वारे 40 लाख 75 हजार 109 रुपये आले होते, त्यापैकी केवळ 21 लाख 2 हजार 557 रुपये खात्यावर भरले. उर्वरित 19 लाख 72 हजार 552 रुपये जमा केले नाहीत.
  • या दोघांनी मिळून एकूण 41 लाख 27 हजार 314 रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनीही चौकशी करून फसवणुकीचा प्रकार निश्चित केला. अखेर अर्चना माने यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
विश्वासघात! कर्मचाऱ्यांनीच लावला फर्म मालकिणीला 41 लाखांना चुना; चार्टर्ड अकाउंटंटमुळे घोटाळा उघड
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement