जगाच्या नजरेत छोटी पान टपरी, पण आत होतं दुसरं विश्व; सत्यसमोर येताच भीतीचं वातावरण, मुंबईमधील विक्रोळीत प्रकार

Last Updated:

ही घटना मुंबईतील विक्रोळीमध्ये घडली. इथे एका पान टपरीमागे एक वेगळंच विश्व लपलेलं होतं. ही घटना जेव्हा समोर आली तेव्हा परिसरातील सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात अनेक छोट्या-मोठ्या पान टपऱ्या, चहाच्या गाड्या आपल्याला सहजच दिसतात. प्रत्येक एका गल्लीत आपल्याला अशा लहान टपऱ्या सहजच दिसतील, त्यात असं काही वेगळं वाटत नाही. पण मुंबईतील एका पान टपरीमागचं एक असं सत्य समोर आलं आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
ही घटना मुंबईतील विक्रोळीमध्ये घडली. इथे एका पान टपरीमागे एक वेगळंच विश्व लपलेलं होतं. ही घटना जेव्हा समोर आली, तेव्हा परिसरातील सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
विक्रोळीच्या टॅगोर नगरमध्ये 48 वर्षीय मनवर जमीरुल्ला अंसारी नावाचा व्यक्ती पानाची छोटीशी टपरी चालवत होता. दिवसभर दुकानात पान, सिगारेट, गुटखा विकला जात होता. मात्र दुकानाच्या आडोशाने मनवर एमडी ड्रग्जसारखी धोकादायक ड्रग्ज विकत होता.
advertisement
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विक्रोळी पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला आणि मनवरला रंगेहाथ अटक केली.
दुकानाची झडती घेतली असता मोठं सत्य समोर आलं
झडतीदरम्यान पोलिसांच्या हाती तब्बल ९२ ग्रॅम एमडी ड्रग्ज लागली. बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे १.८४ लाख रुपये आहे. या प्रकरणी मनवरवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता, याचा शोध घेत आहेत.
advertisement
हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण टॅगोर नगरमध्ये खळबळ उडाली आहे. रोज कुणीही सहजपणे जाईल अशा पान टपरीतून नशेचं घाणेरडं जाळं पसरत होतं, हे ऐकून अनेक रहिवासी हादरले आहेत. काहींनी सांगितलं की, त्या दुकानात सतत संशयास्पद व्यक्ती येत-जात असायच्या, पण कोणी उघडपणे काही बोलण्याची हिंमत केली नाही.
विक्रोळी पोलिसांनी सांगितलं की, अशा नशेच्या धंद्याला प्रोत्साहन देणाऱ्यांना अजिबात माफ केलं जाणार नाही. मनवरचा एखाद्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे. त्याने किती काळ हा धंदा केला आणि कोणकोणाला ड्रग्ज विकली, याचाही तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
जगाच्या नजरेत छोटी पान टपरी, पण आत होतं दुसरं विश्व; सत्यसमोर येताच भीतीचं वातावरण, मुंबईमधील विक्रोळीत प्रकार
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement