यावेळी काही तरुण-तरुणी घरामध्ये दिसले. पोलिसांनी घरातून 6 तरुण आणि तीन तरुणींना अटक केली आहे. सर्वांविरुद्ध एफआयआर दाखल करून कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सीओ बिलासपूर यांनी पटवई पोलिसांच्या पथकासह निस्बा गावातील एका घरावर छापा टाकला. यावेळी घरात 6 तरुण आणि तीन तरुणी आढळून आल्या.
हे लोक घरातच वेश्या व्यवसाय चालवत होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या तीन मुलींपैकी दोन बरेली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. उर्वरित सहा मुलं आणि एक मुलगी हे रामपूरचे रहिवासी आहेत. पोलिसांनी सर्व नऊ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितलं की, सीओ बिलासपूर आणि पोलीस स्टेशन पटवई यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका घरात काही महिला आणि पुरुष अनैतिक वेश्याव्यवसाय करत आहेत. ही माहिती मिळताच सीओ बिलासपूर यांनी तत्काळ आपली टीम तयार करून घराची झडती घेतली.
advertisement
त्यांनी सांगितलं की, रात्रीच्या छाप्यात वेश्याव्यवसायात गुंतलेल्या 9 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यातील काही आरोपींचा गुन्हेगारी इतिहास आहे. यापूर्वीही त्यांच्यावर वेश्याव्यवसाय कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्या सर्व हालचाली तपासल्या जात आहेत. या सर्वांची चौकशी होत आहे. तपासात जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारेही कारवाई केली जाईल.