माहिती मिळण्यास विलंब का?
निलेश घायवळ हातावर तुरी देऊन पळाल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली. निलेश घायवळ याच्या पासपोर्टबाबत पोलिसांनी पुणे पासपोर्ट विभागाकडे माहिती मागितली आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून माहिती मिळालेली नाही. ही माहिती मिळण्यास विलंब का लागत आहे? असा प्रश्न वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
advertisement
निलेश घायवळच्या नावावर किती पासपोर्ट?
निलेश घायवळने पासपोर्टच्या नावात बदल केला. पासपोर्टच्या पत्त्यात बदल केला. त्यामुळे त्याच्याकडे एकूण किती पासपोर्ट आहेत, याची माहिती देखील पोलिसांना मिळू शकलेली नाही, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला विलंब होत आहे.
गँगस्टरविरोधात तक्रार द्या - पुणे पोलिसांचं आवाहन
दरम्यान, शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार पोलिसांनी घेतला असून, त्यानुसार कठोर पावले उचलली जात आहेत. या गँगस्टरविरोधात तक्रार देणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यामुळे लोकांनी पुढं येऊन तक्रार द्यावी, अशी विनंती देखील पोलिसांकडून केली जात आहे. आंदेकर टोळीविरोधात खंडणीची तक्रार देणाऱ्यांसह अन्य तक्रारदारांना सुरक्षा पुरविण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.