क्लिनिकसाठी मागितले पैसे
मुलीने क्लिनिक खरेदीकरिता आईला '40 लाख रुपये दे, मी तुला त्यात हिस्सा देते' असे सांगून पैसे घेतले. त्याच पैशातून रहाटणी येथे दुकान विकत घेतले. त्या दुकानात आईने स्वतःचे पैसे गुंतवले असताना तिला कोणताही हिस्सा न देता तसेच तिचे पैसे परत न करता फसवणूक केली. आईची दोन कोटी 58 लाख 82 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
advertisement
महायुती सरकार अर्थसंकल्पात कर्जमाफी करेल का? शेतकऱ्यांनी मनातलं बोलून दाखवलं
10 डिसेंबर 2012 रोजी मुलगी आणि जावयाने बन्सल प्लाझा येथील दुकान खरेदीसाठी नेऊन ते तुझ्या नावावर करून देऊ, असे सांगून 18 लाख 82 हजार रुपये धनादेशाद्वारे आणि 40 लाख रुपये रोख असे 58 लाख 82 हजार रुपयांना दुकान खरेदी केले. परंतु, ते दुकानही आईच्या नावावर न करता तिच्याकडून त्या दुकानाची पूर्ण किंमत घेतली.
मुलगी व जावयावर गुन्हा
पिंपळे सौदागर येथील 81 वर्षीय वृद्ध महिलेने याप्रकरणी रविवारी (दि. 2) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वृद्धेच्या रहाटणी येथील सनशाईन नगर येथे राहणाऱ्या मुलगी (वय 50) व जावई (वय 55) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे आई-वडील दिल्लीत राहात होते.
मुलीकडून आईला मारहाण
वडिलांचे पासबुक, चेकबुक, पॅनकार्ड, अन्य कागदपत्रे मागितली असता, डॉक्टर मुलीने आईला मारहाण केली. तसेच बनावट स्वाक्षरी करून आई-वडिलांच्या संपत्तीची बेकायदेशीररीत्या विक्री करत आईची फसवणूक केली. त्यानंतर आईने मुलगी आणि जावयाविरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.






