सोनमवर संशयाची सुई
एसआयटी टीमने 7 जून रोजी तीन आरोपींचे प्रोफाईल तपासले असता, सोनम घटनेच्या 10 किलोमीटर आधी तीन आरोपींसोबत दिसली. राजा रघुवंशीची हत्या सोनमच्या समोरच झाली होती. 21 मे रोजी सर्व आरोपी गुवाहाटीला आले होते आणि सोनमच्या 'होम स्टे' जवळच्या हॉटेलमध्ये थांबले होते. 23 मे रोजी हत्या करून ते परतले, तर सोनमही त्याच दिवशी गुवाहाटीहून इंदूरला ट्रेनने परतली. 25 मे रोजी इंदूरला पोहोचल्यावर तिने तिचा प्रियकर राज कुशवाहा याची भेट घेतली आणि एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत घालवला. त्यानंतर एका ड्रायव्हरने तिला बनारस येथे सोडले आणि वाराणसीहून सोनम बसने गाझीपूरला गेली. हत्येनंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज यांच्यात फोनवर बोलणे सुरू होते. ज्यामुळे सोनमवर पोलिसांचा संशय बळावला.
advertisement
राजच्या आईने असं काही सांगितले जे कोणालाच माहिती नाही, राजाच्या अंत्यविधीनंतर...
पोलिसांना मिळालेले पुरावे
शिलॉंग पोलिसांना सुमारे 42 सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. आरोपींनी गुवाहाटीमध्ये हॉटेलबाहेरील दुकानातून शस्त्रे खरेदी केली होती. आरोपी ट्रेनने गुवाहाटीला पोहोचले होते. पोलिसांनी सांगितले की, सोनम केवळ पतीच्या हत्येसाठीच तेथे आली होती आणि लग्नाच्या अवघ्या 10 दिवसांनंतर तिने हत्येचा कट रचला. राजा आणि सोनमचा लग्नानंतर एकही फोटो नसणे, यावरूनही पोलिसांचा संशय वाढला. हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून अशी पोस्ट टाकली, "सात जन्मांचे साथ आहे," ज्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. कारण हत्या रात्री २:१५ वाजता झाली होती.
हत्येमागील कारण आणि पुरावे
पोलिसांना 3 आणि 4 जून रोजीच सोनम हत्येत सामील असल्याची माहिती मिळाली होती. आकाशचा रक्ताने माखलेला शर्ट घटनास्थळी सापडला. तर सोनमने तिचा रेनकोट आकाशला दिला होता. जो घटनास्थळापासून 6 किलोमीटर दूर सापडला. हे सर्व तपासाची दिशाभूल करण्यासाठी केले गेले होते. आरोपी आनंद कुर्मीला अटक केली असता, त्याने घटनेच्या वेळी घातलेलेच कपडे घातले होते. हत्येनंतर सर्व आरोपी 11 किलोमीटर दूर जाऊन भेटले होते. राजा रघुवंशीला मार्गातून काढून राजसोबत राहणे हेच या हत्येमागचे मुख्य कारण होते.
मेघालय पोलिसांची कारवाई
मेघालय पोलिसांनी 50 किलोमीटर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजा आणि सोनम दिसत होते. त्यांच्या आसपास तीन मुलेही दिसत होती. पोलिसांनी परिसरातील सर्व सक्रिय नंबर तपासले, ज्यात तीन नंबर इंदूरमध्ये सक्रिय आढळले. इंदूरमध्ये सुपारी किलरला अटक केल्यानंतर पोलीस मुख्य आरोपी राज कुशवाहापर्यंत पोहोचले. यानंतर सोनमला वाटले की आता लपून उपयोग नाही, म्हणून तिने समोर येऊन नवीन नाटक केले.