ज्या हॉटेल रूममध्ये हे कपल भेटलं होतं, तिथल्या एका बल्ब होल्डरमध्ये आधीपासूनच लपवलेला एक छोटा कॅमेरा त्यांच्या प्रत्येक हालचाली टिपत होता. काही दिवसांनी मुलाच्या मोबाईलवर एक मेसेज आला,“तुझ्या खास क्षणांचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला नको असेल, तर एक लाख रुपये दे.”
तो मेसेज पाहून मुलाच्या अंगावर काटा उभा राहिला. घाबरलेल्या अवस्थेत त्याने थोडा वेळ मागितला आणि दबावाखाली येऊन पाच हजार रुपये ऑनलाइन पाठवलेही. पण त्यानंतर ब्लॅकमेलर्सचा लोभ अजून वाढला.
advertisement
तरुणाने हार मानून अखेर पोलिसांची मदत घेतली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर हा कट उघडकीस आला आणि तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर ब्लॅकमेलिंग, कट रचणे आणि आयटी ॲक्टसह अनेक गंभीर आरोप लावले गेले.
या प्रकरणात खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे, हा कट रचणारी कुणी अनोळखी टोळी नव्हती. तर ती त्या तरुणाच्या गर्लफ्रेंडची जिवलग मैत्रीणच होती. तिनं आपला प्रियकर आणि त्याच्या साथीदारासोबत मिळून पैसे कमावण्यासाठी संपूर्ण प्लॅन आखला होता. या तरुणीला जेव्हा तिच्या बेस्टफ्रेंडने सांगितले की ती आणि तिचा बॉयफ्रेंड भेटणार आहे. तेव्हा तिनेच आपल्या बेस्टफ्रेंडला हॉटेल रुम बुक करायला मदत केली. ज्यामध्ये तिने छुपा कॅमेरा लावला.
ही घटना एक कटू सत्य पुन्हा दाखवून देते. कधीकधी आपण आपल्या काही गोष्टी आपले मित्र किंवा जवळच्या लोकांना सांगितो. पण कधीकधी हेच जवळचे लोक आपला घात करतात. त्यामुळे आपलं कोणत्याही प्रकारचं गुपीत कोणासोबत ही शेअर करताना शंभर वेळा विचार करा. मग ती तुमची बेस्ट फ्रेंड का असेना.