संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) एका केरळमधील आई आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हुंड्यासाठी झालेल्या छळाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. 33 वर्षीय विपंचिका मनी आणि तिची मुलगी वैभवी यांचे मृतदेह 8 जुलै रोजी शारजाच्या अल नाहदा भागातील एका फ्लॅटमध्ये सापडले.
...शेवटी उचललं टोकाचं पाऊल
विपंचिकाच्या मृत्यूनंतर, तिच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केलेली सुसाईड नोट पाहून कोल्लम पोलिसांनी तिचा पती नितीश बालिआभीथिल, नणंद नीतू बेनी आणि सासरे मोहनन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असं कळतंय की, या महिलेला तिच्या सासरच्या मंडळींकडून दिवसेंदिवस असह्य छळ सहन करावा लागला. तो सहन न झाल्यामुळे शेवटी महिलेने हा टोकाचा निर्णय घेतला.
advertisement
पण असं का घडलं?
नोटमध्ये विपंचिका लिहिते, "लग्नात हुंडा कमी मिळाल्याच्या आरोपावरून मला मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या गेल्या. ते म्हणाले की, लग्न भव्य नव्हते, हुंड्यात गाडी मिळाली नाही. मला भिकारी, बेघर म्हटलं गेलं. त्यांनी माझ्या पगाराचीही मागणी केली." तिने असंही म्हटलं आहे की, तिने तिच्या कुटुंबाचा आणि मुलांचा विचार करून दिवसेंदिवस सर्व प्रकारचे अत्याचार सहन केले. पण शेवटी तिला ते सहन झाले नाहीत. म्हणूनच तिने हा टोकाचा निर्णय घेतला.
नवऱ्याची सासऱ्याशी संबंध ठेवण्यास संमती
तिने लिहिलं, "मला कुत्र्यासारखं मारलं गेलं. माझ्या पतीने मला पॉर्नोग्राफीतून शिकलेल्या लैंगिक कृतींसाठी जबरदस्ती केली. मी सात महिन्यांची गरोदर असतानाही, मला घरातून बाहेर काढलं गेलं आणि मला खायलाही दिलं नाही." महिलेने केवळ पतीवरच नाही, तर सासऱ्यावरही भयानक आरोप केले आहेत. तिचा दावा आहे की, तिचे सासरेही तिला शारीरिक अत्याचार करत होते. जेव्हा तिने हे पतीला सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, "मी तुझ्याशी फक्त स्वतःसाठीच नाही, तर माझ्या वडिलांसाठीही लग्न केलं."
आत्महत्या नसून ही आहे हत्या
विपंचिका गेल्या सात वर्षांपासून दुबईतील एका खासगी कंपनीत फाइलिंग क्लर्क म्हणून काम करत होती. तिचा पतीही दुबईतच काम करत होता, पण ते वेगळे राहत होते आणि त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली होती. विपंचिकाच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, हा मृत्यू आत्महत्या नसून 'दोन हत्या' आहेत. यूएई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे ही वाचा : नवदाम्पत्य बघायला गेले सिनेमा, नवरा करू लागला विचित्र हालचाली; ते पाहून नवरी किंचाळली आणि...
हे ही वाचा : झोपेत होता पती, पत्नीला आला राग, उकळत्या पाण्यात मिसळली मिरची पूड अन् केला मोठा कांड!