TRENDING:

Crime News : विवाहित प्रेयसीचा जीव संपवायला पाचवा मजला पुरला नाही, मग आरोपीने... पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

Crime News : गुजरातमधील सूरत शहरात प्रेमसंबंधातून जन्मलेली एक दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा तिच्याच प्रियकराने वादानंतर हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सूरत: गुजरातमधील सूरत शहरात प्रेमसंबंधातून जन्मलेली एक दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचा तिच्याच प्रियकराने वादानंतर हत्या केली आहे. ही घटना सूरतच्या कामरेज परिसरात घडली आहे. प्रियकराने महिलेचा जीव घेण्यासाठी थेट पाचव्या मजल्यावरून तिला खाली फेकले. मात्र, ती श्वास घेत असल्याचे पाहत त्याने तिला संपवण्याचा निर्णय घेतला.
Crkme news
Crkme news
advertisement

20 जून रोजी सायंकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कामरेजमधील एका पाच मजली इमारतीच्या टेरेसवर पीडित महिला आणि तिचा प्रियकर यांच्यात वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या प्रियकराने महिलेवर जोरात हात उगारला. या रागाच्या भरात त्याने थेट तिला इमारतीवरून खाली फेकले. इमारतीच्या टेरेसवरून तिला फेकल्यानंतर ती जिवंत आहे का, हे पाहण्यासाठी आरोपी प्रियकर तातडीने इमारतीच्या खाली आला. मात्र, ती श्वास घेत असल्याचे पाहिले. तिला कायमचं संपवण्यासाठी त्याने जवळच्या शेतात फरफटत नेले. जवळपास 50 मीटरच्या अंतरापर्यंत असलेल्या शेतात नेले. पण, तोपर्यंत तिने प्राण सोडले. घाबरलेल्या आरोपीने तिचा मृतदेह शेतात सोडला.

advertisement

21 जून रोजी पोलिसांना कामरेज गावातील श्याम सुंदर अपार्टमेंटजवळील एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. शेतात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचे नाव रसिलाबेन प्रविणभाई चुडासमा असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी तात्काळ मृत महिलेच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मृत महिला रसिला चुडासमा यांची मुलगी तृप्ती चुडासमा हिने तिच्या आईचा मृतदेह ओळखला. तृप्ती चुडासमा हिने तिच्या आईच्या मृत्यूबद्दल पोलिसांना दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. तृप्ती चुडासमा हिचे धीरू चुडासमा नावाच्या पुरूषाशी अवैध संबंध होते, असे धीरू चुडासमा तिच्या घरी येत असे, अशी माहिती कामरेज पोलीस ठाण्याला मिळताच त्यांनी मृत महिले रसिला चुडासमाचा प्रियकर धीरू चुडासमा याचा शोध सुरू केला आणि त्याला अटक केली.

advertisement

पोलिसांनी आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करणाऱ्या धीरू चुडासमाची चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला. धीरू लक्ष्मण चुडासमाने पोलिसांना सांगितले की, आम्ही खूप दिवसांपासून प्रेमसंबंधात होतो. पण जेव्हा रसिलाच्या पतीला हे कळले तेव्हा तो तिला सोडून गेला. नंतर आम्ही अधूनमधून भेटत राहिलो. पोलिसांनी सांगितले की, दरम्यान, 20 जून रोजी भेट झाल्यानंतर कामरेजने भांडणानंतर त्याच्या विवाहित प्रेयसीला पाचव्या मजल्यावरून ढकलले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : विवाहित प्रेयसीचा जीव संपवायला पाचवा मजला पुरला नाही, मग आरोपीने... पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल