मुलीच्या काळजीमुळे घटना उघडकीस
अनिता मोहिते या मांजर्डे गावाबाहेर एका मळ्यात एकट्याच राहत होत्या. त्यांची मुलगी मुंबईमध्ये राहते. गेले दोन दिवस ती आईला फोन करत होती, पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मुलीने काळजीपोटी नातेवाईकांशी संपर्क साधला. गुरुवारी रात्री नातेवाईकांपैकी काहीजण अनिता यांच्या घरी गेले. घराच्या मुख्य दाराला आतून कडी होती, पण मागील बाजूचा दरवाजा उघडा होता. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, अनिता यांचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला.
advertisement
डोक्याला गंभीर दुखापत
या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही बोलावण्यात आले. शुक्रवारी सकाळी सावळज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महागिर यांच्या पथकाने घटनास्थळीच मृतदेहाची तपासणी केली. या तपासणीत मृतदेहाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसून आले. तसेच, त्यांच्या चेहऱ्यावर, कपाळावर आणि डाव्या कानावरही जखमा आढळल्या.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 'व्हिसेरा' राखून ठेवला असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच हा खून आहे की घातपात, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. अनिता मोहिते एकट्या राहत होत्या आणि आजूबाजूला इतर घरे नसल्यामुळे ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
हे ही वाचा : बीडमध्ये वाल्मिक गँगची धतिंग, तरुणाला बेदम मारहाण अन् Video काढला, असं काही म्हणाला की... पाहा
हे ही वाचा : विश्वासघात! कर्मचाऱ्यांनीच लावला फर्म मालकिणीला 41 लाखांना चुना; चार्टर्ड अकाउंटंटमुळे घोटाळा उघड