TRENDING:

Thane News: मैत्रिणीला त्रास दिला, ‘त्या’ने गेमच केला, ठाण्यातील खून प्रकरणाला धक्कादायक वळण

Last Updated:

Thane Crime: गुजरातमध्ये राहणाऱ्या रघु याच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली असून तिनेही या गुन्ह्यासाठी सहकार्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: ठाणे पश्चिम भागातील सिडको बस थांब्याजवळ झालेल्या खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एका महिलेसह अन्य दोन जणांना अटक केली आहे. मैत्रिणीला सातत्याने त्रास देणाऱ्या व्यक्तीचा काटा काढण्यासाठी हे हत्याकांड घडवून आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
मैत्रिणीला त्रास दिला, ‘त्या’ने गेमच केला, ठाण्यातील खून प्रकरणाला धक्कादायक वळण
मैत्रिणीला त्रास दिला, ‘त्या’ने गेमच केला, ठाण्यातील खून प्रकरणाला धक्कादायक वळण
advertisement

चेंदणी कोळीवाडा परिसरात राहणारे महेश नाखवा (वय 54) यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचे बुधवारी उघडकीस आले. या घटनेनंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने समांतर तपास सुरू केला.

Pune Crime: सीमेवर शत्रूला रोखलं, पण घरातल्याच 'शत्रू'नं घात केला! पुण्यात सेवानिवृत्त मेजरसोबत धक्कादायक घडलं

advertisement

तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. आरोपी हे गुजरातकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले. अहमदाबादकडे जाणाऱ्या मार्गावर कारवाई करत काली उर्फ रघु चौहान (वय 27) आणि शायर मंग्रोलिया (वय 21) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत महेश नाखवा हा रघु चौहान याच्या मैत्रिणीला सातत्याने त्रास देत होता. यामुळे संतप्त झालेल्या रघुने आपल्या मित्रासह संगनमत करून नाखवा याचा काटा काढण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे सिडको बस थांब्याजवळ नाखवा याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली.

advertisement

या प्रकरणात गुजरातमध्ये राहणाऱ्या रघु याच्या मैत्रिणीलाही अटक करण्यात आली असून तिनेही या गुन्ह्यासाठी सहकार्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे या हत्याकांडात सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे आणि पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Thane News: मैत्रिणीला त्रास दिला, ‘त्या’ने गेमच केला, ठाण्यातील खून प्रकरणाला धक्कादायक वळण
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल