TRENDING:

'लवकर घरी जा', सांगूनही ऐकलं नाही, तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, नाशकात काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Last Updated:

नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं तीन लहान मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं तीन लहान मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. सुट्टीच्या दिवशी तिन्ही मित्र एका मित्राच्या शेतात गोठ्यावर फिरायला गेले होते. परत येत असताना अनर्थ घडून तीन मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तिन्ही मुलांचा बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. तिघांची मृत्यूची बातमी कळताच तिन्ही कुटुंबांमध्ये एकच आक्रोश बघायला मिळाला. विशेष म्हणजे मृत पावलेल्या तिघांचंही नाव साई आहे.
News18
News18
advertisement

साई हिलाल जाधव (१४), साई केदारनाथ उगले (१४) आणि साई गोरख गरड (१५) असं मृत पावलेल्या तीन मित्रांची नावं आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी तिघेही अन्य एका मित्रासह गरड यांच्या गोठ्यावर फिरायला गेले होते. तिथे चौघेही गायीच्या वासरासोबत खेळले. गंगेवर पोहण्यास जाऊ असे ठरले. दरम्यान, गरडच्या वडिलांनी घरी लवकर जा, असं चौघांना बजावलं. काही वेळ थांबून चौघे मित्र घरी निघाले.

advertisement

पण वाटेत बालमित्रांना पोहण्याचा मोह आवरला नाही. बांधकाम सुरू असलेल्या साईटवर खोदलेल्या खड्ड्यात त्यांनी पोहण्याचा निर्णय घेतला. पण यातील एका मित्र मागे फिरला. तो घरी सांगून मित्रांसोबत आला नव्हता. त्यामुळे घरी आई वाट बघत असेल म्हणून तो तिथून गेला. यानंतर 'साई' नावाचे हे तिन्ही मित्र खोदलेल्या खड्यात पोहण्यासाठी उतरले. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. तिघेही गाळात रुतून बुडाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात आज वाढ की घट? कोणत्या मार्केटमध्ये किती मिळाला भाव? Video
सर्व पहा

रविवार दुपारपासून तिघे बेपत्ता झाले होते. त्यानंतर तिन्ही कुटुंबीयांकडून त्यांचा १२ तास शोध घेण्यात आला. रात्री २ वाजता मिसिंग तक्रार देण्यात आली. रात्रभर नातेवाइकांनी तिघांचा त्र्यंबक, सोमेश्वर, गंगापूर धरण, गोदाघाट आदी परिसरात शोध घेतला. मात्र सकाळी तिघांचे मृतदेह साईटवर पाण्यात आढळून आले. अभिषेक गरड यांनी गोठ्या शेजारील बांधकाम साईटवर बघितले असता तिघांचे कपडे सापडले. अग्निशामक दल, पोलिसांनी शोध घेत तिघांचे मृतदेह पाण्यात गाळात रुतलेल्या अवस्थेत आढळले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पालक व नातलगांनी मृतदेह कवटाळत काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'लवकर घरी जा', सांगूनही ऐकलं नाही, तीन मित्रांचा दुर्दैवी अंत, नाशकात काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल