नानाभाऊ कदम यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी सोनीजवळा येथील तानाजी रामदास गायकवाड यांच्यासोबत झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. पती तानाजी हा ज्ञानेश्वरीला नेहमीच मारहाण करत असल्यामुळे ती आपल्या मुलांसह माहेरी, कदमवाडी येथे भाऊ आसाराम कदम यांच्याकडे राहण्यासाठी आली होती.
हॉटेल पेटवण्यापूर्वी धमकी
दोन आठवड्यांपूर्वी तानाजी गायकवाड कदमवाडी येथे आला होता. त्यावेळी त्याने ‘माझ्या बायकोला नांदायला पाठवले नाही, तर मेव्हणा आसाराम कदम याला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती.
advertisement
या धमकीनंतर रविवारी रात्री तानाजीने मेव्हणा आसाराम कदम यांच्या अहमदनगर-अहिल्यानगर महामार्गावरील हॉटेलला आग लावली. या आगीत हॉटेलचे पत्र्याचे शेड, डीप फ्रीज, फ्रीज, काउंटर, खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी आसाराम कदम यांच्या फिर्यादीवरून तानाजी गायकवाड याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीने याआधीही केली होती तक्रार
पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दल ज्ञानेश्वरीने याआधी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात दोन वेळा पती तानाजी गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा : 'मार्केटमध्ये क्रेझ पाहिजे', म्हणत तो नाचवत होता नंगी तलवार, पोलिसांनी कळलं अन् भररस्त्यात आक्रित घडलं!