दारूच्या नशेत वाद विकोपाला
ही घटना दोन दिवसांपूर्वी मंगळवारी, 5 ऑगस्ट रोजी घडली. मृत रोशन, त्याचा धाकटा भाऊ राकेश आणि त्याचा मित्र किरण उर्फ लारा हे दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. दारू पिल्यानंतर राकेशने मोठा भाऊ रोशन याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तू आपल्या आईशी का भांडतोस?’ या प्रश्नावरून त्यांच्यात वाद इतका वाढला की, राकेश आणि त्याचा मित्र किरण यांनी रोशनला पकडून बेदम मारहाण केली. त्यांनी रोशनवर विटांनी हल्ला केला. जखमी अवस्थेत रोशन घरी आला आणि बाहेर असलेल्या ओट्यावर झोपला. त्यानंतरही मद्यधुंद अवस्थेत असलेल्या राकेशने त्याच्या पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या रोशनचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव
सुरुवातीला राकेश आणि किरणने रोशनचा मृत्यू दारूच्या नशेत झाल्याचा बनाव केला. पण काही स्थानिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सखोल तपास केला असता ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ राकेश वासनिक आणि त्याचा मित्र किरण उर्फ लारा मारबते यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम103 (1) आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस अधीक्षक मयंक माधव आणि पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा : Kolhapur News: बहिणीने 'अपशब्द' वापरला, भाऊ जिवानिशी गेला; लिफ्ट मागितली अन् मागून केले सपासप वार!
हे ही वाचा : हात-पाय बांधलेले, कपडे फाटलेले... चिपळूणात निवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीचा डीव्हीआर गायब!