TRENDING:

लग्नानंतर पहिल्या रात्री जोरजोरात ओरडू लागला नवरदेव; खोलीचा दरवाजा उघडताच हादरले कुटुंबीय

Last Updated:

पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. आवाज होताच कुटुंबीय खोलीत पोहोचले. यानंतर..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : नवरीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच असं काही केलं की घरातील सगळ्यांनाच धक्का बसला. रात्री उशिरा नवरदेवाचा ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सदस्यही खोलीत धावले. कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडताच सर्वजण थक्क झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नवरीने लग्नानंतर पहिल्या रात्रीच नवरदेवाची धुलाई केली.
नवरीने केली नवरदेवाला मारहाण (प्रतिकात्मक फोटो)
नवरीने केली नवरदेवाला मारहाण (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

आवाज ऐकताच कुटुंबीय खोलीत पोहोचले. यानंतर हे प्रकरण कसंबसं शांत झालं. पतीने पत्नी मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 22 नोव्हेंबर रोजी माधोपूर येथे राहणाऱ्या तरुणाचं लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला कोतवाली येथे राहणाऱ्या तरुणीशी झालं होतं. यानंतर लग्नाच्या रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला.

crime : माहेरी जाण्यास केला विरोध, बायकोने एका बुक्कीत फोडला नवऱ्याचा डोळा, बुब्बुळ काढलं बाहेर!

advertisement

दरम्यान, पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. आवाज होताच कुटुंबीय खोलीत पोहोचले. यानंतर हे प्रकरण शांत झालं. हे प्रकरण मुलीच्या माहेरी आणि सासरच्या मंडळींपर्यंत पोहोचलं, त्यानंतर दोन्ही पक्ष समोरासमोर आले. सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. घरच्या घरी हे प्रकरण मिटलं नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इन्स्पेक्टर अमरजीत सिंग यांनी सांगितलं की, दोन्हीकडील लोकांमध्ये तडजोडीचे प्रयत्न सुरू आहेत.

advertisement

लग्नाच्या दिवशी दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर आता पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. पत्नी मानसिक आजारी असल्याचं पती सांगत आहे. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पत्नीने पतीला मारहाण केली. पत्नीच्या मानसिक आजाराची बाब सासरच्यांनी लपवून ठेवल्याचं पीडित तरुणाचं म्हणणं आहे. पोलीस तक्रारीनंतर शनिवारी सकाळी दोन्ही पक्ष गंगानगर कोतवाली येथे पोहोचले. जिथे महिला इन्स्पेक्टरने विवाहित महिलेशी बातचीत केली. विवाहितेचं म्हणणं आहे की, बेड टचवरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पतीने तिला खोलीबाहेर काढलं होतं.

advertisement

लग्नानंतर दोघांमध्ये भांडण झाल्यानं दोन्ही पक्षांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. समाजात आणि गावात विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही बाजूचे लोक प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या गेल्या चार दिवसांपासून आणि दोन्ही पक्षांमध्ये हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांतता प्रस्थापित करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही पक्षाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असं निरीक्षक अमरजीत सिंह यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
लग्नानंतर पहिल्या रात्री जोरजोरात ओरडू लागला नवरदेव; खोलीचा दरवाजा उघडताच हादरले कुटुंबीय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल