crime : माहेरी जाण्यास केला विरोध, बायकोने एका बुक्कीत फोडला नवऱ्याचा डोळा, बुब्बुळ काढलं बाहेर!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
पती आणि पत्नीत जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात पत्नीने पतीचा डोळा फोडला आहे. यामुळे पतीचा एक डोळा निकामी झाला असून, त्याची दृष्टी गेली आहे.
सोनभद्र, 25 नोव्हेंबर : वैवाहिक जीवनात पती-पत्नीत वादविवाद, भांडण किंवा मतभेद होणं ही गोष्ट खूप सामान्य आहे; पण काही वेळा या गोष्टींचं रूपांतर गंभीर गुन्ह्यात होतं. उत्तर प्रदेशात नुकतीच एक घटना घडली आहे. पती आणि पत्नीत जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात पत्नीने पतीचा डोळा फोडला आहे. यामुळे पतीचा एक डोळा निकामी झाला असून, त्याची दृष्टी गेली आहे. पत्नीचा संताप पतीला चांगलाच महागात पडल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. या घटनेची सोनभद्र जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
उत्तर प्रदेशातल्या सोनभद्र जिल्ह्यातल्या रामगड गावात एक धक्कादायक घटना घडली. पत्नीने भांडणादरम्यान रागाच्या भरात पतीचा डोळा फोडला असून, यामुळे पतीचा एक डोळा निकामी झाला असून, त्याची दृष्टी गेली आहे. रामगडमध्ये गुलाम रब्बानी आणि अलकमा हे दाम्पत्य राहतं. तीन वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात अलकमाने रब्बानीचा उजवा डोळा फोडला. यामुळे गुलामचा एक डोळा निकामी झाला आहे.
advertisement
दरम्यान, ही घटना घडल्यावर गुलामला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे; मात्र त्याने एक डोळा कायमचा गमावला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. डोळ्याची जखम खोल असल्याने दृष्टी येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी अलकमाला अटक केली आहे. एका छोट्या कारणासाठी अलकमा इतकं गंभीर कृत्य करील, असं कुटुंबीयांना वाटलं नव्हतं.
advertisement
विवाहानंतर गुलाम आणि अलकमा यांचा संसार ठीकपणे सुरू होता. काही दिवसांपासून अलकमा माहेरी जाण्यासाठी गुलामकडे हट्ट करत होती; पण गुलामचा याला विरोध होता. त्याचा विरोध असतानादेखील अलकमाचा हट्ट कायम होता. शुक्रवारी (24 नोव्हेंबर) अलकमाने पुन्हा माहेरी जाण्याचा हट्ट सुरू केला. यावरून गुलाम आणि अलकमा यांच्यात भांडण सुरू झालं. रागाच्या भरात अलकमा काठीनं गुलामला मारहाण करू लागली. मारहाण करूनही तिचं समाधान झालं नाही. अखेरीस तिनं बोटांनी गुलामचा उजवा डोळा फोडला आणि बुब्बुळ बाहेर काढलं. या घटनेत गुलामने त्याचा एक डोळा कायमचा गमवला आहे. गुलामच्या एका डोळ्याची दृष्टी गेलेली असून, या कृत्यासाठी पोलिसांनी अलकमाला अटक केली आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
November 25, 2023 9:08 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
crime : माहेरी जाण्यास केला विरोध, बायकोने एका बुक्कीत फोडला नवऱ्याचा डोळा, बुब्बुळ काढलं बाहेर!