फक्त स्वयंपाकातच नाही तर आरोग्यासाठीही कढीपत्ता लाभदायक, झटक्यात आजार होतील दूर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
दररोजच्या जेवणात फोडणीशिवाय पदार्थांची चव अपुरीच वाटते. त्या फोडणीत सजावटीपासून सुगंधापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे कडीपत्ता. पण, तितकाच मर्यादित नसून त्याचे आणखी बरेच फायदे आहेत.
दररोजच्या जेवणात फोडणीशिवाय पदार्थांची चव अपुरीच वाटते. त्या फोडणीत सजावटीपासून सुगंधापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे कडीपत्ता. पोहे, उपमा, दाळ, आमटी, सांबार अशा कुठल्याही पदार्थात कडीपत्ता टाकताच चवीसोबत भूकही वाढते. पण, कडीपत्त्याचे फायदे इथेच थांबत नाहीत. आयुर्वेदात त्याला सुवासिक औषधी वनस्पतीचा दर्जा दिला आहे. तसेच शरीराला पोषण देणारे अनेक गुण कडीपत्त्यामध्ये आहेत.
कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम, लोह (Iorn), फॉस्फरस आणि व्हिटॅमिन C आहे. यासर्व घटकांसाठी अनेकवेळा अनेक सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. मात्र योग्य पद्धतीने कडीपत्ता आहारात घेतल्यास सप्लिमेंट्सची गरज राहत नाही. 100 ग्रॅम कडीपत्त्यात तब्बल 830 मिली ग्रॅम कॅल्शिअम असते. तसेच लोह (Iorn) आणि व्हिटॅमिन C देखील भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडांना मजबुती देण्यापासून ते केस, त्वचा, डोळे आणि पचनसंस्थेपर्यंत कडीपत्ता उपयुक्त ठरतो.
advertisement
कडीपत्ता शरीरातील टॉक्सिन्स कमी करून नैसर्गिकरित्या बॉडी डिटॉक्स करण्यात मदत करतो. यामुळे चरबी कमी होण्याची प्रक्रिया वेगाने घडते. सकाळी कडीपत्ता उकळून त्याचे कोमट पाणी पिल्यास वजन नियंत्रणात राहते, असेही आयुर्वेदात सांगण्यात येते. कॅल्शियमची कमी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. हाडं दुखणे, सांधे दुखणे, लवकर थकवा येणे अशा समस्या टाळण्यासाठी कडीपत्ता अत्यंत गुणकारी मानला जातो. दैनंदिन आहारात कडीपत्ता योग्य पद्धतीने घेतल्यास याचे असंख्य फायदे आहेत.
advertisement
तीळ आणि कडीपत्ता मिळून याची चटणी तुम्ही आहारात घेऊ शकता. दोन्ही कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे. हाडांसाठी विशेष फायदेशीर आहेत. तसेच नाचणी आणि कडीपत्ता याचीही चटणी आहारात घेतल्यास कॅल्शियमची कमतरता कमी होण्यास मदत होते. तसेच पनीर आणि कडीपत्ता प्रमाणे बदाम आणि कडीपत्ता सुद्धा हाडदुखी, कमजोरी, सांधेदुखीवर उपयुक्त आहे.
सध्याच्या काळात महागडी औषधे, सप्लिमेंट्स किंवा टॉनिक घेऊन शरीरातील घटक वाढविण्याकडे जास्त कल आहे. पण, किचनमधील साधी, नैसर्गिक सामग्रीही आपल्याला तितकीच उपयुक्त ठरू शकते. त्यात कडीपत्ता हे अनमोल पण दुर्लक्षित असलेलं सुपरफूड आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात वापरल्यास कडीपत्ता आपलं आरोग्य सर्व अंगांनी सुधारू शकतो.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 27, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त स्वयंपाकातच नाही तर आरोग्यासाठीही कढीपत्ता लाभदायक, झटक्यात आजार होतील दूर

