ऋषी कपूरसाठी माधुरी दीक्षितने नाकारली नाना पाटेकरची फिल्म, ठरली ब्लॉकबस्टर; जिंकला राष्ट्रीय पुरस्कार

Last Updated:
Madhuri Dixit Nana Patekar : नाना पाटेकर यांच्यासोबत माधुरीने चार चित्रपटांत काम केले होते. मात्र, माधुरीने नानांच्या एका चित्रपटाला नकार दिला होता, जो ब्लॉकबस्टर ठरला.
1/8
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज आणि अत्यंत लोकप्रिय कलाकार म्हणजे माधुरी दीक्षित आणि नाना पाटेकर. ८० आणि ९० च्या दशकात या दोघांनी अनेक हिट चित्रपट दिले.

advertisement
2/8
वयाने १६ वर्षांनी मोठ्या असलेल्या नाना पाटेकर यांच्यासोबत माधुरीने चार चित्रपटांत काम केले होते. मात्र, माधुरीने नानांच्या एका सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपटाला नकार दिला होता. मात्र, तो चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

3/8
१९८४ च्या 'अबोध' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या माधुरी दीक्षितला 'तेजाब' ने ओळख मिळवून दिली. सतत कामात व्यस्त असणाऱ्या माधुरीने तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक हिट चित्रपट नाकारले. याच यादीत नाना पाटेकर यांचा एक चित्रपट होता, ज्याचे नाव आहे 'अग्नि साक्षी'.

4/8
यापूर्वी माधुरी आणि नाना पाटेकर यांनी चार चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्यामुळे 'अग्नि साक्षी'साठी निर्मात्यांनी सर्वप्रथम माधुरीलाच विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी माधुरी 'याराना' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. डेट्सची कमतरता असल्याने तिने हा चित्रपट करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

5/8
पार्थो घोष दिग्दर्शित 'अग्नि साक्षी' हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. माधुरीने नकार दिल्यावर या चित्रपटात मनीषा कोईराला आणि जॅकी श्रॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

6/8
या चित्रपटात नाना पाटेकर यांनी सहाय्यक भूमिका केली होती, पण त्यांनी साकारलेले 'विश्वनाथ' हे पात्र इतके दमदार होते की, ते नायक जॅकी श्रॉफवरही भारी पडले. या भूमिकेसाठी नाना पाटेकर यांना 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता' चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

7/8
'अग्नि साक्षी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपटाचे बजेट केवळ ४.७५ कोटी रुपये होते, पण या सिनेमाने जगभरात ३१.३५ कोटी रुपये कमावले. म्हणजे बजेटच्या तब्बल सातपट कमाई केली.

8/8
१९९६ मध्ये 'राजा हिंदुस्तानी' नंतर हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. माधुरीच्या एका नकाराने एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची संधी दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाली.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement