याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आनंद जिल्ह्यातील नापाड गावातील 23 वर्षीय समीर राठोड वडोदरातील कोयाली गावात आपल्या मामासोबत राहत होता. त्यांच्यासोबतच गेट सुपरवायझर म्हणून काम करत होता. गुरुवारी तो अचानक बेपत्ता झाला. यानंतर शुक्रवारी नंदेसरी जीआयडीसीजवळ एक मृतदेह आढळून आला.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतदेह समीरचा असल्याचं समजलं. मृतदेहाजवळ रिव्हॉल्व्हर सापडलं. पोलिसांच्या तपासात हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांची चौकशी केली. समीरचा मोबाईलही तपासला. यावेळी आत्महत्येची पुष्टी झाली.
या प्रकरणी एसीपी आर. डी. कवणे यांनी सांगितलं की, समीरची 5 दिवसांपूर्वी एंगेजमेंट झाली होती. पण, त्याची होणारी पत्नी त्याच्याशी बोलत नव्हती. हा प्रकार तरुणाने त्याच्या मित्राला चॅटमध्ये सांगितला होता. याच कारणावरून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वडोदराच्या जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.