Matrimonial Site : मॅट्रिमोनियल साईटवरुन अनेक मुलींना गंडा, महिला डॉक्टरकडून 20 लाख उकळले, कशी होती पद्धत?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
Matrimonial Site : लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या बनावट वराला गोरखपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कानपूरचा रहिवासी आहे. या सगळ्यात त्याच्यासोबत त्याची बहीणही होती.
गोरखपूर : मॅट्रिमोनियल साईटवरुन मुलींना लग्नासाठी मागणी घालून पुढे त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार नवीन नाहीत. नुकताच उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये अशा साईटवरुन मुलींची फसवणूक करणं आणि पैसे उकळणं हाच धंदा करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आपण फॅशन डिझायनर आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा पुतण्या असल्याची बतावणी करुन हा गुन्हेगार मॅट्रिमोनियल साईटवरील मुलींशी मैत्री करायचा. त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून लग्नाची मागणी घालायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. अशा पद्धतीने त्याने कित्येक तरुण मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, मात्र नुकतीच एका तरुणीने त्याला अद्दल घडवली आहे. ही तरुणी डॅाक्टर आहे. पैसे उकळून फसवणूक केल्याप्रकरणी तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
advertisement
हे प्रकरण कॅरिअरगंज पोलिस स्थानकाच्या हद्दीतील आहे. मूळची चंडीगड येथील रहिवासी असलेल्या, सध्या गोरखपूरमध्ये राहाणाऱ्या डॅाक्टर तरुणीने आरोपीविरोधात पोलिसांकडे धाव घेतली. तिने गेल्या वर्षी जीवनसाथी डॅाट कॅामवर आपलं प्रोफाईल तयार केलं होतं. ऑक्टोबर 2023 मध्ये पहिल्यांदा कानपूर येथील अनुभव तिवारी नावाच्या तरुणाने तिच्याशी संपर्क साधला. आपण फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन आहोत, काका काँग्रेसचे मोठे नेते आहेत अशी माहिती त्याने दिली. दोघांची चांगली मैत्री झाली. फोनवरही नियमित बोलू लागली. कान्हा टेक्सटाईल कंपनी आपल्या मालकीची असल्याचं त्याने तरुणीला सांगितलं.
advertisement
डॅाक्टर तरुणी म्हणाली, ‘गेल्या सात डिसेंबरला तो गोरखपूरला आला. आधार कार्ड दाखवलं. त्यावर त्याच्या जन्मतारखेमध्ये 2000 साल नोंदवलं होतं. त्याने मला बोलण्यात गुंतवलं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली. मी त्याला प्रामाणिक समजले आणि बोलत राहिले. मात्र नंतर अधून मधून काही ना काही अडचण आली असं सांगून तो माझ्याकडे पैसे मागू लागला. माझा अपघात झालाय आणि उपचारांसाठी पैसे हवे आहेत असं त्याने अनेकदा सांगितलं. व्हॅाट्सॲपववर प्रिस्क्रिप्शनही पाठवलं. आपल्या डोक्यावर बंदूक रोखलेल्या अवस्थेत किंवा डिप्रेशनचा आजार आहे असं सांगून रेल्वेच्या रुळावर झोपूनही त्याने मला व्हिडिओ कॉल केले. आत्महत्या करण्याची इच्छा त्याने अनेकवेळा बोलून दाखवली. तो नाटक करतो आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळे मी त्याला समजावत राहिले. माझ्याकडून त्याने 19 लाख 38 हजार रुपये उकळले. मी पैसे परत मागितले तेव्हा त्याने बनावट डिमांड ड्राफ्ट मला पाठवला. त्यावेळी मला आपण फसवले गेलोय ही जाणीव झाली,’ असं या तरुणीने स्पष्ट केलं.
advertisement
वाचा - घरी कुणी नाही म्हणून गर्लफ्रेंडने बायफ्रेंडला घरी बोलावलं, आईची मदत घेतली आणि...
या तरुणीची तक्रारी दखल करून घेऊन पोलिसांनी अनुभवला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. या पूर्वीही आपण कित्येक तरुणींना गंडा घातल्याचं त्याने मान्य केलं. शादी डॅाट कॅामसारख्या अनेक मॅट्रिमोनियल साईट्सवर त्याची बनावट अकाउंट असल्याचं त्याने कबूल केलं. या पूर्वी मुंबईतील एका तरुणीकडून 50 लाख रुपये उकळल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं, मात्र या पूर्वी कुठल्याही तरुणीने त्याची पोलिसांकडे तक्रार न केल्यामुळे तो बिनबोभाट फसवणूक करत राहिला. या सगळ्या प्रकरणात अनुभवला त्याची बहीण रुची हिची साथ असल्यामुळे तिच्याविरुद्घही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
March 03, 2024 6:21 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Matrimonial Site : मॅट्रिमोनियल साईटवरुन अनेक मुलींना गंडा, महिला डॉक्टरकडून 20 लाख उकळले, कशी होती पद्धत?